शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

इंदिरा गांधी रुग्णालयात लवकरच सुविधा; प्रधान सचिवांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:50 PM

आमदारांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा बोजवारा उडल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या तक्रारींची दखल आमदार रईस शेख यांनी घेत रुग्णालयाची दुरुस्ती व इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांची गुरुवारी भेट घेतली. येत्या काही दिवसांमध्येच रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन प्रधान सचिवांनी शेख यांना दिले.

गांधी स्मृती रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळूनही अनेक वर्षे येथे सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पाठपुरावा करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने शेख यांच्या मागणीनुसार राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. बैठकीमध्ये रुग्णालयात डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड कोर्सेस सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याद्वारे रुग्णालयामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील. 

स्त्रीराेगतज्ज्ञांची नियुक्ती न झाल्यास कारवाईn मागील तीन महिन्यांपासून स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ नसल्याने महिला व बालकांचे खूपच हाल होत आहेत. त्यामुळे तीन स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. nनियुक्ती न झाल्यास उपसंचालिका व शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट आणि मंजूर असलेली रिक्त पदेही भरण्याचे आदेश बैठकीत दिले.

 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल