शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांसाठी सर्रास पिण्याचे पाणी

By admin | Updated: March 25, 2017 01:18 IST

शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाई असताना बेकायदा बांधकामांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे.

उल्हासनगर : शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाई असताना बेकायदा बांधकामांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे. अशा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक प्रमोद टाले यांनी आयुक्तांकडे केली आहे. एक दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.उल्हासनगर पालिका निवडणुकी दरम्यान धनदांडग्यांनी नगरसेवकांच्या मदतीने व भूमाफियांना हाताशी धरून बेकायदा बांधकामे उभी केली. शहरात बेकायदा बांधकामाची चर्चा झाल्यावर प्रभाग क्रमांक ४ चे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी पथकासह बेकायदा बांधकामावर कारवाई केली. मात्र अन्य प्रभागात पाडकाम करवाई न झाल्याने चर्चेचा विषय झाला. तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी बेकायदा बांधकामावर अंकुश ठेवला होता. तसेच पालिका निवडणुकी दरम्यान उभ्या राहिलेल्या बांधकामावर कारवाईचे आदेश दिले होते. निंबाळकर यांच्या बदलीने भूमाफियांनी डोके वर काढले असून नगरसेवकांच्या मदतीने बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत.नवनियुक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पहिल्याच दिवशी शहराला बेकायदा बांधकामे शाप असल्याचे सांगून कारवाईचे संकेत दिले होते. मात्र त्यांच्यानंतर पाडकाम कारवाई ऐवजी सर्रास बेकायदा बांधकामाला उत आला आहे. यामध्ये प्रभाग अधिकारी नंदलाल समतानी, अजित गोवारी, मनिष हिवरे यांची नावे पुढे येत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. गोवारी यांच्यावर तर गेल्या आठवडयात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल आहे. तत्कालीन आयुक्त निंबाळकर यांनी थेट प्रभाग अधिकाऱ्यांसह बीट निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्यासह संबंधितांना बेकायदा बांधकाम प्रकरणी जबाबदार धरून कारवाईचे आदेश दिले होते. पिण्याचे पाणी बांधकामांसाठी वापरले जात असल्याचा आरोप टाले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)