शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

‘कोविड’वरील खर्चाने ओढवली आर्थिककोंडी, सरकारने फिरवली पाठ : अंबरनाथ पालिकेपुढे मोठा पेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 1:11 AM

ambernath News :

- पंकज पाटील अंबरनाथ - कोविड रुग्णांवरील उपचाराबाबत पालिका प्रशासनाने कोणत्याच आर्थिक बाबीकडे लक्ष दिले नाही. सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी अपेक्षा होती. त्याच अपेक्षेवर अंबरनाथ पालिकेने कोट्यवधी रुपये कोविड रुग्णांवर खर्च केले.  मात्र, आता सरकारने पाठ फिरविल्याने अंबरनाथ पालिकेची आर्थिककोंडी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोविडवरील खर्च कमी करण्यास सुरुवात केली आहे.

कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने जलदगतीने काम सुरू केले होते. कोणतीच यंत्रणा नसतानाही स्वखर्चाने डेंटल कॉलेज येथे सर्व सुविधायुक्त असे कोविड रुग्णालय उभारले. त्यासोबतच सक्षम यंत्रणाही उभारली. डॉक्टरांचे मोठे पथक या ठिकाणी रुग्णांची सेवा करत होते. हे सर्व करत असताना सरकार आर्थिक हातभार लावणार, या आशेवरच पालिकेने खर्च केला. मात्र, सुरुवातीला आलेले सात कोटी वगळता पालिकेला कोणतीच आर्थिक मदत मिळाली नाही. हजारो रुग्णांवर ज्या रुग्णालयाने उपचार केले, ते आता आर्थिककोंडीत सापडले आहे. डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कामगारांचा पगार, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांचे मानधन, रुग्णांचे जेवण, औषध यांचा आर्थिक भार पालिकेवर पडला आहे. रुग्णालय उभारण्यासाठीही लाखो रुपये खर्च केले आहे. सोबत आता पालिकेने आयसीयू कक्षही उभारला आहे.

आर्थिक भार पडत असल्याने पालिकेने आता रुग्णालयाची जबाबदारी खाजगी संस्थेवर सोपवून त्यातून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. डॉक्टर, परिचारिका यांना कमी करण्यास पालिकेने सुरू केले आहे. यासोबतच फवारणी यंत्रणाही बंद केली आहे. डॉक्टरांना राहण्यासाठी दिलेले हॉटेलही रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने अनेक बिले प्रलंबित ठेवली आहेत.

कोविड नियंत्रणावर अंबरनाथ पालिकेने खर्च केला आहे. सरकारने काही प्रमाणात निधी दिला. अतिरिक्त निधीची मागणी सरकारकडे केली आहे. सरकार यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार आहे. मात्र, अंबरनाथ पालिका रुग्णांवर उपचार करण्यात कमी पडणार नाही.  - डॉ. प्रशांत रसाळ मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका

टॅग्स :ambernathअंबरनाथcorona virusकोरोना वायरस बातम्या