शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

अखेर नगराध्यक्षपदासाठी 21 नोव्हेंबरला मतदान, नव्याने जाहीर केला निवडणूक कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 8:10 PM

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 14 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला होता.

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 14 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला होता. मात्र हा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला अवघ्या 3 तासांत रद्द करावा लागला होता. 15 नोव्हेंबरला नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, आता नगराध्यक्षपदाची निवडणूक 21 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 18 नोव्हेंबर देण्यात आली आहे. या आदेशात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख देखील 18 नोव्हेंबरच देण्यात आली आहे. राजकीय दबावामुळे असा प्रकारचा निवडणूक कार्यक्रम पुढे आल्याचे समोर येत आहे.14 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात 24 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 15 नोव्हेंबर ही एकमेव ठेवल्याने हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला मागे घेण्याची वेळ आली. एका दिवसात उमेदवारी निश्चिती कशी होणार ही राजकीय अडचण लक्षात घेऊन हे आदेश रद्द करण्यात आले. बुधवारी 15 नोव्हेंबरला पुन्हा नव्याने नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या नव्या कार्यक्रमानुसार आता अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका ह्या 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता घेण्यात येणार आहे. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही 18 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. या अर्जाची छाननी करून वैध उमेदवारांची यादी 2 नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तर लागलीच दोन तासात म्हणजे दुपारी 4 वाजेर्पयत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निश्चित केली आहे. ज्या दिवशी उमेदवारी भरणार त्याच दिवशी उमेदवारी मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता पालिकेच्या सभागृहात निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्याने आता राजकीय समीकरणे जोराने फिरण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दगाफटका बसू नये यासाठी शिवसेना सतर्क झाली आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरambernathअंबरनाथ