Environmental protection slogan will be given to school students | शालेय विद्यार्थी देणार पर्यावरण रक्षणाचा नारा

शालेय विद्यार्थी देणार पर्यावरण रक्षणाचा नारा

बदलापूर : ‘प्लास्टिक टाळू या, पर्यावरण सांभाळू या’चा नारा देत बदलापूरच्या योगी अरविंद गुरुकुल शाळेचे विद्यार्थी मातृभूमी परिचय शिबिरासाठी सायकलवरून रायगड जिल्ह्यात रवाना झाले आहेत. शाळेचे तिसरीपासून नववीपर्यंतचे विद्यार्थी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.

शाळेचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे, शिक्षकवर्ग आणि पालकांच्या उपस्थितीत शिबिरासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. योगी श्री अरविंद गुरु कुल ही शाळा विद्यार्थी यांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक उपक्र म राबवित असते. शाळेच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत मातृभूमी परिचय शिबिर होते. विद्यार्थी यांच्यात सहकार्य, समयसूचकता, साहस, ध्यैर्य, राष्ट्रभक्ती, स्वक्षमतांची जाणीव ओळख, श्रमाचे महत्त्व, निसर्गाच्या प्रती प्रेम आणि जागृती याद्वारे स्वत:त कला जाणीव निर्माण करणे, माणुसकी हा गुण मिळवून तो जपणे अशा गुणांनी विकसित करण्यासाठी ‘मातृभूमी परिचय शिबीर’ हा उपक्र म राबविला जातो. या उपक्र मात वरील सर्व गुण विकास व्हावा या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याला संधी उपलब्ध करून देण्यात येते. सोमवारी सकाळी पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी मामणोली येथे तर तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी वसई- विरार येथे, पाचवीचे विद्यार्थी वज्रेश्वरी येथे, सहावी आणि सातवीचे विद्यार्थी संगमनेरला जाणार आहेत. या विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आठवीचे विद्यार्थी रवाना झाले आहेत. विद्यार्थी व्यवस्थापनासोबत लहानांचे संगोपन, ममत्त्व, काळजी घेणे या गुणांनी विद्यार्थी परिपूर्ण होतात असा विश्वास शाळेने व्यक्त केला.

१० फेब्रुवारीला बदलापूरला येणार
नववीचे विद्यार्थी रायगड परिसरात ७०० ते ७५० किलोमीटर इतके अंतर सायकलने प्रवास करणार आहेत. या कालावधीत सायकल शिबिराद्वारे साहस, निर्णय क्षमता, शारीरिक क्षमता, मानिसक क्षमता, स्वावलंबन, श्रमाचे महत्त्व निसर्गप्रेम, निसर्ग संतुलन जाणीव, वाहतूक नियम, संघ जाणीव अशा सर्व गुणांनी विकसित करण्यासाठी ही साहसी संधी दिली जाते. या शिबिराद्वारे उद्याचे सर्वार्थाने सक्षम नागरिक तयार होतात. या शिबिरात रायगड जिल्ह्यातील विविध स्थळांना विद्यार्थी भेटी देणार असून तेथील परिस्थिती जाणून घेणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी विद्यार्थी बदलापूरला परत येणार आहेत.

Web Title: Environmental protection slogan will be given to school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.