शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पर्यावरणवादी पक्के स्वार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 03:03 IST

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरील निर्बंध न्यायालयाने कायम ठेवले. सरकारनेही या निर्बंधांच्या पक्षात मत दिले होते. मात्र, डीजे वाजवणारच, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.

 - अविनाश जाधवगणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरील निर्बंध न्यायालयाने कायम ठेवले. सरकारनेही या निर्बंधांच्या पक्षात मत दिले होते. मात्र, डीजे वाजवणारच, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. पर्यावरणवादी हे पक्के स्वार्थी असल्याचा मनसेचा आरोप असून ते व अशी विघ्नसंतोषी माणसे केवळ हिंदूंच्या सणांमध्ये कधी डीजेवरून, तर ढोलताशा वाजवण्यावरून, तर कधी दहीहंडीचे थर लावण्यावरून विघ्न आणतात, असा मनसेचा दावा आहे.मचे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव असो की नववर्ष स्वागतयात्रा असो, या सगळ््या गोष्टींना जेव्हा विरोध होतो, तेव्हा लोकांमध्ये चीड निर्माण होते. मग लोक तक्रारी करतात किंवा कोणाकडे तरी मदत मागायला जातात. आम्ही नववर्षाचे स्वागत करताना आमचे ढोल पथक बंद केले जाते. ते तर पारंपरिक वाद्य आहे, परंपरागत ते वाजवले जाते. दहीहंडी आली की, तो उत्सव साजरा करायचा नाही, तिथेही विरोध होतो, त्यावर बंधने आणली जातात. आमच्या हिंदूंच्या किंवा मराठी लोक जे सण मोठ्या प्रमाणात साजरे करतात, त्या सणांना कधी डीजे लावण्यावरून तर कधी थर लावण्यावरून विरोध होतो, मग त्यातून लोकांचा उद्रेक होतो. डीजे किंवा ढोलताशा पथकांवरील अन्यायाचे विषय निर्माण होतात. आम्हाला ढोलताशा वाजवायला परवानगी देताना आवाजाची मर्यादा आणली जाते. साधारण चारपाच माणसं एकत्र येऊन जेव्हा गप्पा मारतात, तेव्हा तो आवाजही ६० डेसिबलपर्यंत जातो. विरोध करणाऱ्यांनी केवळ विरोध करू नये, तर आम्हाला पर्याय द्यावा, कोणत्याच गोष्टींची परवानगी आम्हाला देणार नसाल आणि सर्वच गोष्टींवर बंदी येणार असेल, तर आमचा त्याला विरोधच राहील. दीड दिवसाचे, पाच दिवसांचे आणि १० दिवसांचे विसर्जन असे वर्षातील फक्त तीन दिवस आम्ही डीजे लावायला परवानगी मागितली आहे. वर्षाचे बाराही महिने अजान वाजवली जाते, चारचार किलोमीटरपर्यंत त्या अजानचा आवाज जातो. त्यावेळी पहाटे ५ वाजता ध्वनिप्रदूषण होत नाही का? आम्ही त्यावेळी झोपलेलो असतो. आमचे म्हणणे एकच आहे की, कायदा सगळ्यांसाठी एकच असावा. एका धर्मासाठी एक आणि दुसºया धर्मासाठी वेगळा नसावा. आता जे दिसतंय त्यात फक्त हिंदूंच्या सणांनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आम्ही विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, जर मंडळ परवानगी देत असेल, तर तुम्ही बिनधास्त डीजे वाजवा. सर्व धर्मांसाठी कायद्याची समान अंमलबजावणी व्हावी. आजपर्यंत अजानबाबत कोणता निर्णय घेतला गेला? त्यावर चर्चा खूप झाली, पण सगळ्या मशिदींवरचे भोंगे उतरवले गेले, असे कधी पाहिले का? गणपती बसलेला मंडप सर्रासपणे उखडला जातो. मग शुक्रवारी नमाज पढताना रस्ते अडवले जातात. त्यावर का बोलले जात नाही? ते रस्ते का मोकळे केले जात नाही? हे सगळे घडते तेव्हा कायदा मोडतो. हिंदू-मुस्लिम असा धर्म बघून निर्णय करणे कितपत योग्य आहे. दहा लाख गोविंदा मनसेच्या निर्णयानंतर रस्त्यावर येतात, याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेला मनसेची भूमिका पटली आहे. आम्ही सतत कायदा हातात घेतो म्हणून मनसेची राजकीय अवस्था तोळामासा झाली, हे हेत्वारोप अयोग्य आहेत. भाजपा १५ वर्षांपूर्वी दिसत होता का? आठदहा वर्षांत शिवसेना संपेल की काय, अशा परिस्थितीत होती. पण परत सत्तेत आली. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करून काँग्रेस संपली का? यापुढील ५० वर्षे भाजपाच सत्तेत येणार आहे का? त्यामुळे कोणताही पक्ष हा संपत नसतो. मनसे २०१४ च्या निवडणुकीनंतर संपली का? परंतु, येत्या निवडणुकीत लोकांचे, तरुणांचे हेच प्रश्न हाती घेतल्यामुळे मनसे महाराष्ट्रात खूप मोठी झालेली दिसेल.पर्यावरणवादी बोगस आहेत. यांच्या फायद्यासाठी यांचे पर्यावरण आहे. डॉ. महेश बेडेकर पर्यावरणाचा मुद्दा उचलतात, परंतु त्यांनीच जोशी-बेडेकर महाविद्यालय बांधताना खारफुटीची कत्तल केली आहे. खारफुटीची कत्तल करून त्यावर भरणी टाकताना पर्यावरणाचा विषय त्यांना आठवला नाही का? पर्यावरणवाद्यांसाठी पर्यावरण हा विषय केवळ त्यांच्या स्वार्थासाठी आहे. जिथे त्यांचा फायदा असतो, तिथे पर्यावरण हा विषय लागू होत नाही. सण सणांसारखे साजरे व्हावेत. मग यापुढे मौनव्रत धारण करून सण साजरे करायचे का? गणपती आल्यावरही हजारो लोक हाताची घडी, तोंडावर बोट घेऊन शांत बसले आहेत, अशा प्रकारे सण साजरे करू का? पुण्यात २५ हजार महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष म्हटले तर त्यावेळी त्यांच्या बोलण्यामुळे ध्वनिप्रदूषण होते म्हणून उद्या तेही बंद करा, असा आग्रह हे पर्यावरणवादी धरतील. ठरावीक लोक एकाच धर्माच्या पाठी हात धुऊन लागले आहेत. दुसºया धर्मांच्या वाटेला जाताना त्यांना भीती वाटते. मनसे एकमेव पक्ष असा आहे की, जो लोकभावनेचा विचार करतो. लोकभावनांचा विचार होत नसेल, तर आम्ही कायदा हातात घेऊ. आम्ही चांगली गोष्ट केली की, तो राजकीय स्टंट वाटतो. आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केले तेव्हा तो स्टंट वाटला, पण स्टेशन परिसरातून लोकांना चालताना आनंद वाटतो, हे ते जाहीरपणे कबूल का करत नाही. आम्ही रेल्वेभरतीवर आंदोलन केले, तेव्हा तोही स्टंट ठरवला गेला. पण आज मराठी मुले रेल्वेत कामाला घेतली जातात, महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा होतात. आमच्या अशा स्टंटमधून राज्यातील तरुणांंचा फायदा होत असेल, त्यांना दहीहंडी साजरी करायला मिळत असेल, तर होय आम्ही असे स्टंट करणार. जर वर्षभर अजानचा आवाज सहन करत असाल, तर वर्षातील तीन दिवस डीजेचाही आवाज सहन करा. मिरवणुकीत नाचणाºया मुलांमध्ये उत्साह व जोश असतो, त्यांच्या चेहºयावरील आनंदावर विरजण टाकू नका.(लेखक मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष आहेत)

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८MNSमनसे