Sarpanch: वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड
By नितीन पंडित | Updated: October 12, 2022 17:13 IST2022-10-12T17:12:46+5:302022-10-12T17:13:23+5:30
Sarpanch: भिवंडी तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाग्यश्री जयेंद्र पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.

Sarpanch: वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड
- नितीन पंडित
भिवंडी - तालुक्यातील वडघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाग्यश्री जयेंद्र पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
वडघर ग्राम पंचायतीच्या सरपंच सुषमा जालिंद्रनाथ पाटील यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्राम पंचायत वडघर कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी भाग्यश्री पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे यांनी भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी ग्रामपंचायत वडघरचे ग्रामसेवक,आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच भाग्यश्री पाटील यांनी दिली आहे.