शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कमळ फुलले तरच कार्यकर्त्यांना आनंद, सत्तेचा छोटा वाटा नको, विरोधक शिवसेना की राष्ट्रवादी, याबाबत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 06:54 IST

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाणे महापालिकेवर प्रथमच भाजपचे कमळ फुलेल. मात्र, शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली तर सत्तेच्या छोट्या वाट्यावर समाधान मानावे लागेल, असे भाजपचे माजी नगरसेवक खासगीत बोलत आहेत.

ठाणे  : एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाणे महापालिकेवर प्रथमच भाजपचे कमळ फुलेल. मात्र, शिंदे यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली तर सत्तेच्या छोट्या वाट्यावर समाधान मानावे लागेल, असे भाजपचे माजी नगरसेवक खासगीत बोलत आहेत.प्रभाग रचनेच्या मुद्यावरून ठाण्यात आरोप-प्रत्यारोप केले जात होते. किंबहुना आपल्या फायद्यासाठी शिवसेनेने प्रभाग रचना करून घेतल्याचा आरोप भाजपने केला होता. प्रभाग रचनेनंतर पालिकेवर पुन्हा भगवा फडकणार हेच मतदारांच्या मनावर ठसवण्याकरिता महापालिका मुख्यालयावर दोन भगवे झेंडे आणि प्रवेशद्वारावर वाघाचे चित्रही लावण्यात आले.     महापालिकेत सध्या शिवसेनेचे ६७ संख्याबळ आहे. आगामी निवडणुकीत संख्याबळ ९० पार जाईल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात होता. आता शिंदे यांनीच बंड पुकारल्याने त्यांना मानणारे नगरसेवक त्यांच्या सोबत जातील. शिवसेनेत किती नगरसेवक राहतील व किती शिंदे यांच्याबाबत जातील, याबाबत चित्र स्पष्ट नाही. 

शिंदे यांचा सामना शिवसेना की राष्ट्रवादीसोबत    ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगत होता. आत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा भाजपसोबत युती केली तर त्यांचा सामना शिवसेनेविरुद्ध की राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध होणार याचे कुतूहल राजकीय वर्तुळात आहे.     समजा शिंदे यांच्या दबावामुळे भाजप-शिवसेना युती झाली तर कालपर्यंत एकत्र असलेले शिंदे व जितेंद्र आव्हाड निवडणुकीत परस्परविरोधी उभे असलेले दिसतील.

शिंदे बंडाच्या वावटळीने भाजपमधील इच्छुक गारठलेठाणे  : शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याने ठाण्यात शिवसेनेच्या विरोधात सातत्याने उभे राहून संघर्ष करणाऱ्या भाजपमधील निष्ठावंतांची धाकधूक वाढली आहे. शिंदे भाजपसोबत आले किंवा भाजपमध्ये सामील झाले तरी भाजपच्या जुन्याजाणत्यांना आता शेवटच्या बाकावर तर बसावे लागणार नाही ना, अशी भीती अनेकांनी बोलून दाखविली.शिंदे शिवसेनेतून भाजपमध्ये आले तर येथे भाजपने बाळसे धरल्यासारखे दिसेल. मात्र शिंदे हे चतुर राजकारणी असल्याने ते आपल्या व आपल्या समर्थकांच्या लाभाकरिता भाजपचा वापर करतील, अशी शंका भाजपची मंडळी व्यक्त करीत आहेत. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचे नाते कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे शिंदे यांना भाजप सोबतच्या सत्तेत चांगली पदे व खाती लाभतील. परंतु तसे झाल्यास ठाण्यासह जिल्ह्यातील मूळ भाजपच्या आणि इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासारखे नेते ठाण्यातील शिवसेनेच्या विरोधात गेली अडीच वर्षे संघर्ष करीत आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना