ठाणे - राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीच्या मार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर याचे तीव्र पडसाद ठाण्यात पडले असून पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी भारत सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून भाजप सरकार, नरेंद्र मोदी आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढे शरद पवार यांच्या केसांना जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ईडी झाली येडी... ठाण्यात भाजप सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:05 IST
शरद पवार यांच्या केसांना जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ईडी झाली येडी... ठाण्यात भाजप सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी भारत सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून भाजप सरकार, नरेंद्र मोदी आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जाणूनबुजून अशा प्रकारची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी यावेळी केला आहे.