ठाणे जिल्ह्यात दिवसभरात २४४ रुग्णांची नोंद तर ७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 21:36 IST2020-05-18T21:35:06+5:302020-05-18T21:36:15+5:30
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १२६४ इतका झाला असून मृतांचा आकडा ३७ वर गेला आहे

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात २४४ रुग्णांची नोंद तर ७ जणांचा मृत्यू
ठाणे - ठाणे जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी २४४ बाधित रुग्णांच्या नोंदीसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार ९२८ झाला तर, मृतांचा ११९ वर पोहोचला आहे. ठाणे महापालिकाक्षेत्रात सर्वाधिक ९१ कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा एक हजार १२६९ वर पोहोचला.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १२६४ इतका झाला असून मृतांचा आकडा ३७ वर गेला आहे. तर, कल्याण डोंबिवलीत ३० रुगांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ५३० इतका झाला, उल्हानगरमध्ये ७ रुग्णांची नोंद करण्यात आली असून बंधीतांचा आकडा १२६ झाला. तसेच मीरा भाईंदरमध्ये २९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ३५९ झाला असून मृतांचा आकडा ११ झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा ४३ झाला आहे. बदलापूरमध्ये २ रुग्णांची करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा ११६ झाला. तसेच अंबरनाथमध्ये दोन नवीन रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा ३६ वर गेला. तर, ठाणे ग्रामीण भागात ८ नव्या बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा १८५ वर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार ९२८ वर गेला असून मृतांचा आकडा ११९ इतका झाला आहे.