शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीची दखल घेत नसल्याने नगरसेविकेला रडू कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:16 IST

मीरा गावातील गावकीची जागा असल्याचा दावा करत त्यातील जुन्या बांधकामाची बेकायदा दुरूस्ती सुरू केल्याच्या विरोधात काही ग्रामस्थांनसह प्रभाग समिती सभापती वीणा भोईर यंनी महापालिकेकडे तक्रार केली होती.

मीरा रोड : मीरा गावातील गावकीची जागा असल्याचा दावा करत त्यातील जुन्या बांधकामाची बेकायदा दुरूस्ती सुरू केल्याच्या विरोधात काही ग्रामस्थांनसह प्रभाग समिती सभापती वीणा भोईर यंनी महापालिकेकडे तक्रार केली होती. पण बेकायदा बांधकाम रोखण्याऐवजी कारवाईस पालिका आयुक्तांसह प्रभाग अधिकारी टाळटाळ करत असल्याने जर तक्रारींवर कारवाईच होत नसेल तर नगरसेवक आणि सभापतीपदाचा उपयोग काय असे सांगत आयुक्त दालनातच भोईर यांना रडू कोसळले. अखेर आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यास तातडीने फोन करुन काम बंद करण्याचे आदेश दिल्या नंतर भोईर शांत झाल्या.मीरा गावातील गावदेवी मंदिराजवळ पडीक असणारी चमचा कंपनी गेली अनेक वर्ष बंद आहे. परंतु या कंपनीचे छप्पर काढून पूर्णपणे दुरूस्तीचे काम केल्याने भोईर यांनी प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांना फोन करून तक्रार केली. परंतु बोरसेंनी बेकायदा दुरूस्तीचे काम थांबवले नाही शिवाय कोणतेही लेखी उत्तरही दिले नाही. त्यामुळे २१ मे रोजी भोईर यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली.बोरसे यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी बेकायदा दुरूस्तीचे काम रोखले नाहीच उलट ते काम बेकायदा नसल्याचे सांगत कारवाईस नकार दिल्याचे भोईर यांनी तक्रारीत नमूद केले. परंतु त्यानंतरही आयुक्त व बोरसे यांनी कारवाई केली नाही. या विरोधात गावातील काही ग्रामस्थांनी सोमवारी बैठक घेऊन सामूहिक सह्या करत आयुक्तांच्या नावे तक्रार केली. ग्रामस्थांनी निवेदनात ही जमीन गावकीची असून बेकायदा बांधकाम तातडीने बंद करत कारवाईची मागणी केली.भोईर यांनी ग्रामस्थांची तसेच स्वत:ची तक्रार घेऊन मंगळवारी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनीही कारवाईस असमर्थता व्यक्त केल्याने प्रभाग अधिकाºयापासून आयुक्तांना लेखी तक्रारी देऊनही जर कारवाई होत नसेल तर आम्ही सभापती आणि नगरसेवकपदी राहून उपयोग काय ? असा सवाल भोईर यांनी केला. तक्रार करूनही पालिका अधिकारी उडवाउडवी करत असल्याने त्यांना रडू कोसळले. त्यावेळी समिती सदस्य सजी आयपीसुध्दा उपस्थित होते. आयुक्तांनी त्यांची समजूत काढत बोरसे यांना मीरा गावातील काम बंद करण्याचे आदेश दिले.>सजी यांनी हसण्यावर नेलेया बाबत सजी यांना विचारणा केली असता ते केवळ हसले व बोलायचे टाळले. तर भोईर यांनी मात्र घडलेल्या घटनेस दुजोरा देत अधिक बोलणे टाळले.