शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

डोंबिबलीत लोकलमधील रेटारेटीच्या वादातून टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:48 IST

एल्फिस्टन रोड स्थानकाच्या रेल्वे पुलावरील दुर्घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका तरूणावर मंगळवारी भयंकर प्रसंग उद्भवला. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवलीच्या स्थानकावर आलेल्या लोकलमधील रेटारेटीमुळे धीरज वसंत म्हसकर (२३)रा. सांगर्ली, समर्थ कृपा या प्रवाशाला चार जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला.

 डोंबिवली - एल्फिस्टन रोड स्थानकाच्या रेल्वे पुलावरील दुर्घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका तरूणावर मंगळवारी भयंकर प्रसंग उद्भवला. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवलीच्या स्थानकावर आलेल्या लोकलमधील रेटारेटीमुळे धीरज वसंत म्हसकर (२३)रा. सांगर्ली, समर्थ कृपा या प्रवाशाला चार जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. केडीएमटीचे ड्रायव्हर अवतारसिंग बलवेत यांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाला वेळीच उपचार मिळाले तर एकाला पोलिसांच्या ताब्यात देणे शक्य झाले.लोहमार्ग पोलीस डोंबिवली यांनी दिलेल्या माहितीनूसार धीरजवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तो ठाण्यातील एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करतो. नेहमीप्रमाणे तो डोंबिवली स्थानकात तो फलाट क्रमांक ३ वर सकाळी ९ वाजून २० मिनिटांची लोकल पकडण्यासाठी उभा होता. टिटवाळ्याहून सीएसटीकडे जाणारी लोकल डोंबिवलीत आली होती, पण ती गर्दीने खचाखच भरली होती. त्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्नात असतानाच धीरजची बॅग एका प्रवाश्याला लागली. या प्रवाश्याने कॉलर पकडून गळ्याला धरत खाली खेचले. गर्दीच्या रेट्यामुळे धीरज फलाटावर पडला. त्याला त्याच लोकलमधील ४जणांच्या टोळक्याने लाथा-बुक्क्याने झोडपले. धीरजने हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पळ काढला. मात्र या टोळक्याने त्याला पुलावर गाठून तेथेही मारले. त्यातुन कसेबसे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर धीरजने त्यातील एका हल्लेखोराला पकडून ठेवले. हे दृश्य बघण्यासाठी स्थानकात गर्दी जमली. मात्र जखमी धीरजसाठी कुणीही पुढे आले नाही. तेवढ्यात हा प्रकार पाहून केडीएमटीचा बहादूर ड्रायव्हर अवतारसिंग बलवेत यांनी स्टेरिंगवरून उडी मारून घटनास्थळी धाव घेत, त्यांनी जखमी धीरजला धीर दिला. अचानक झालेल्या या घटनेमुळे धीरज घाबरला होता. ही घटना रामनगरहद्दीत घडल्याने काहींनी त्याला रामनगर पोलीस ठाण्यात नेले. पण घटनेची सुरुवात रेल्वे स्थानकातून झाल्याने त्याची तक्रार लोहमार्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिराने वर्ग करण्यात आल्याचे पोलीस निरिक्षक गौरीप्रसाद हिरेमठ म्हणाले.दरम्यान, धीरजच्या आई-वडीलांनी धीरज याला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये हलविले. या घटनेची खबर कळताच भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह हॉस्पिटलमध्ये जाऊन धीरज याच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच पाटील यांनी तातडीने उपचार देण्यासंदर्भात तेथिल वैद्यकीय आरोग्य अधिका-यांना सूचना केल्या. हॉस्पिटलच्या वैद्यकिय अधिका-यांनीही तपासणी केल्याचे पाटील म्हणाले. लोहमार्ग पोलिसांनी टोळक्यातील एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. जखमी धीरज याच्या जबानीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून पोलिस अन्य हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे हिरेमठ म्हणाले. धीरजने देखिल शिविगाळ केली, आधी मारामारीला सुरुवात केली, त्यामुळे नेमका गुन्हा दाखल करावा की न करावा याचा तपास लोहमार्ग पोलीस करत असून चाप्टरची केस लावण्यात येइल असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.परिवहनचे चालक अवतारसिंग बलवेत यांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाची मारहाणीतुन सुटका झाली, तसेच त्याला योग्यवेळी उपचार मिळाले. त्यांच्या प्रसंगावधानाची दखल घेत प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला या मंचच्या वतीने अवतारसिंग यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मंचचे प्रमोद केणे यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाcentral railwayमध्ये रेल्वे