शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांकडून हरताळ

By admin | Updated: September 11, 2015 00:53 IST

महापालिकेने जाहीर केलेल्या मंडप आचारसंहितेला दहीहंडी उत्सवात धाब्यावर बसविल्यानंतर आता गणेशोत्सव काळातही अनेक मंडळांनी ती खुंटीला टांगली आहे.

- अजित मांडके,  ठाणेमहापालिकेने जाहीर केलेल्या मंडप आचारसंहितेला दहीहंडी उत्सवात धाब्यावर बसविल्यानंतर आता गणेशोत्सव काळातही अनेक मंडळांनी ती खुंटीला टांगली आहे. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेची मंडळे आघाडीवर असून त्यांनी एक चतुर्थांशऐवजी अर्ध्याहून अधिक रस्ताच वाहतुकीसाठी बंद करणारे मंडप उभारले आहेत. परंतु, पालिकेकडून अद्याप एकाही मंडळावर कारवाई न झाल्याने आचारसंहितेच्या बागुलबुवाची स्टंटबाजी करतात तरी कशाला? असा सवाल आता ठाणेकरांनी केला आहे.पाचपाखाडी भागात नरवीर तानाजी मित्र मंडळाने अर्धा रस्ता अडवून मंडप उभारणीला सुरुवात करण्यापूर्वीच शिवसेनेच्या अनेक मंडळांनीही शहरात रस्त्यांवर ते थाटण्यास सुरुवात केली आहे. महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या चंदनवाडी मित्र मंडळाने यंदाही रस्त्याचा अर्धा भाग मंडपासाठी व्यापल्याने येथील वाहतुकीवर ताण येऊ लागला आहे. दुसरीकडे घोडबंदर भागातील खेवरा सर्कलमध्ये तर शिवसेनेच्या एका नेत्याने मंडपासह मूर्तीचीही दिशा बदलून अर्धा रस्ता व्यापला आहे. तर, काजूवाडी भागातही अर्ध्या रस्त्यावरही शिवसेनेच्या दुसऱ्या एका नेत्याने मंडपाचा पसारा मांडला आहे. वागळे इस्टेट भागात तर नाल्यावरच मंडप उभारला असून किसननगरसह इतर भागातही अशा प्रकारे मंडप उभारले जात आहेत. परंतु, पाया उभारण्यापासून ते संपूर्ण मंडप उभारेपर्यंत एकाही पालिका अधिकाऱ्याचे त्याकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहिता तयार करून रस्त्याच्या एक चतुर्थांश म्हणजेच २५ टक्के जागेतच मंडप उभारणीला परवानगी देण्याचे धोरण महासभेत सर्वपक्षीयांचा विरोध डावलून मंजूर करून घेतले. परंतु, असे असतानादेखील पालिकेला दहीहंडी उत्सवात याची अंमलबजावणी करता आली नाही. तर, आता गणेशोत्सवातही पालिकेच्या नाकावर टिच्चून शहरात अनेक मंडळांनी रस्त्यांवरच मंडप उभारण्यास सुरुवात केली. मात्र, यावर कारवाई करण्याचे टाळून पालिकेनेच आपले धोरण बासनात गुंडाळले की काय, अशी चर्चा ठाणेकरांत सुरू झाली आहे. पोलिसांचीही बघ्याची भूमिकामहापालिकेच्या आचारसंहितेला ठाणे खाडीत बुडवून गणेशोत्सव मंडळांनी शहरातील अनेक रस्ते व्यापून वाहतुकीला अडथळे निर्माण केले आहेत. मात्र, पालिकेप्रमाणेच पोलिसांनीही त्याबाबत बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. एरव्ही, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या मोटारसायकलींवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी या अनधिकृत मंडपांकडे काणाडोळा केल्याने ठाणेकरांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.