शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘देऊळबंद’मुळे गणेशभक्तांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST

उमेश जाधव लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची होणारी अलोट गर्दी ...

उमेश जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची होणारी अलोट गर्दी हे जणू समीकरणच. परंतु, मंगळवारी दीड वर्षानंतर ‘अंगारकी’चा योग जुळून आला असतानाही वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे मंदिर न्यासने मंदिर भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी बंद ठेवल्याने भाविकांचा हिरमोड झाला. काहींनी बाहेरील बंद गेटमधून मंदिराचे दर्शन घेतले. तसेच तेथेच हार, फुले वाहिल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे शुकशुकाटामुळे व्यवसाय बुडाल्याचे पूजा साहित्य दुकानदार व रिक्षाचालकांनी सांगितले.

कोरोनाच्या नवीन लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन केले आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांनी ‘अंगारकी’ला येथील गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. भाविकांच्या गैरसोय टाळण्यासाठी न्यासने पार्किंगमध्ये एलएडी स्क्रीनद्वारे सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन देण्यात आले. मंदिरात सकाळी अभिषेक, पूजा, आरती झाली. नित्यनेमाने सर्व आरत्या व विधी ठरावीक पुजारी यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती विश्वस्त योगेश जोशी यांनी दिली.

दरम्यान, मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. परंतु, तुरळक प्रमाणात काही भक्त बाप्पाच्या चरणी नाही, पण मुखदर्शन घेण्यासाठी टिटवाळ्यात दाखल झाले. त्यात मंदिर बंद असल्याची कल्पना नसलेले काही जण होते. मात्र, त्यांना बंद गेटमधून मंदिराचे दर्शन घेऊन परतावे लागले. मंदिर बंद राहिल्याने पूजा साहित्य विक्री व रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला.

---------

मी नेहमी ‘अंगारकी’ला गणपती मंदिरात येतो. आज ही बाप्पाचे मुखदर्शन घेण्यासाठी आलो. परंतु, सर्वच गेट बंद असल्याने बाहेरूनच मंदिराचे दर्शन घेऊन परतावे लागले.

- दिलीप देवकर, भाविक

--------------

‘अंगारकी’ म्हटली की आम्हाला पर्वणी असते. या दिवशी आमचा व्यवसाय ४०-५० हजारांवर जातो. परंतु, मंदिर बंद असल्याने हजार रुपयांचाही व्यवसाय झाला नाही.

- विनिता तरे, पूजा साहित्याची विक्रेती

------------

‘अंगारकी’ला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त टिटवाळ्यात येतात. त्यामुळे रिक्षाचालकांचा धंदा रोजच्यापेक्षा एका दिवसात चारपट होतो. आज मंदिर बंद असल्याने आमच्या धंद्यावर परिणाम झाला आहे.

- बाळा भोईर, रिक्षा युनियन अध्यक्ष, टिटवाळा

--------------