शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांची दिवाळी तुटपुंज्या बोनसमुळे मंदीतच!

By admin | Updated: November 10, 2015 00:13 IST

तारापूर एमआयडीसीमधील बहुसंख्य कंत्राटी कामगारांना मिळालेल्या पुटपुंज्या बोनसमुळे गगनाला भिडलेल्या महागाईत त्यांची दिवाळी मंदीतच जाणार आहे

पंकज राऊत , बोईसरतारापूर एमआयडीसीमधील बहुसंख्य कंत्राटी कामगारांना मिळालेल्या पुटपुंज्या बोनसमुळे गगनाला भिडलेल्या महागाईत त्यांची दिवाळी मंदीतच जाणार आहे. तर, कायम व कंत्राटी कामगारांना बोनसच्या रकमेचे वाटप हे रोखीने न देता ते चेक किंवा संबंधित कामगारांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात यावे, हा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश तारापूरचे उद्योजक व कंत्राटदार धुडकावून लावत आहेत. तारापूर एमआयडीसीमध्ये बहुसंख्य कंत्राटी कामगारांना बारा तासांची ड्युटी करावी लागत असून शेकडो कामगार तर आठवड्याची सुटी तसेच किमान वेतनापासून वंचित आहेत. बोनसच्या तुटपुंज्या रकमेचे खरे कारण किमान वेतन न मिळणे, हे आहे. बोनसची रक्कम संबंधित कामगारांना चेकने किंवा त्या कामगारांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केल्यास बोनस रक्कम किती दिली, हे खरे वास्तव समोर येईल, या भीतीने उद्योजक व कंत्राटदार बोनस रोख स्वरूपात देतात, तर किती कामगारांना बोनसच्या रकमेचे वाटप चेक किंवा बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात आले, त्यासंदर्भातील काहीही माहिती तारापूर येथील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तारापूर एमआयडीसीमधील बहुसंख्य उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांचा वापर होत असून त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के कंत्राटी कामगार हे तारापूर येथील सतत वेगवेगळ्या उद्योगांत काम करतात किंवा परराज्यांत निघून जातात. त्यामुळे अशा हजारो कंत्राटी कामगारांच्या नशिबी बोनस कधीच नसतो. त्याचा फायदा मालक व कंत्राटदारांना होत असतो. कामगार कायद्यासंदर्भातील बहुसंख्य नियम पायदळी तुडवून मालक व कंत्राटदार कंत्राटी कामगारांची पिळवणूक करून गडगंज नफा कमावतात, परंतु बोनस अ‍ॅक्टनुसार किमान ८.३३ टक्के बोनस देऊन बोनस दिल्याच्या फुशारक्या मारतात. वास्तविक पाहता ज्या उद्योगांना नफा झाला आहे, त्यांनी तरी जास्तीतजास्त टक्के बोनस द्यावा, ही सर्वसाधारण कंत्राटी कामगारांची माफक अपेक्षा असते. परंतु, तीही अपेक्षा पूर्ण केली जात नाही, ही खरी शोकांतिका आहे.