डोंबिवलीत शिवसेना उपशाखा प्रमुखावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 06:06 PM2017-08-11T18:06:21+5:302017-08-11T18:06:21+5:30

निळजे लोढा परिसराचे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सुरेश कदम यांच्यावर आज दुपारी 12 वाजता लोढा चौकात तीन अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने प्रहार करुन वार केला. या घटनेत त्यांच्या दंडाला दुखापत झाली आहे.

Dombivliit Shiv Sena vice-president attacked | डोंबिवलीत शिवसेना उपशाखा प्रमुखावर हल्ला

डोंबिवलीत शिवसेना उपशाखा प्रमुखावर हल्ला

Next

डोंबिवली, दि. 11 - निळजे लोढा परिसराचे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सुरेश कदम यांच्यावर आज दुपारी 12 वाजता लोढा चौकात तीन अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने प्रहार करुन वार केला. या घटनेत त्यांच्या दंडाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी कदम यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मारेक-यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कदम यांचा टूर्स अॅण्ड ट्रव्हॅल्सचा व्यवसाय आहे. त्यांना एका ग्राहकाचा फोन आल्याने ते लोढा चौकात पैसे घेण्यासाठी निघाले होते. ते त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. इतक्यात त्यांच्या मागून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शर्ट रक्ताने माखला. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांचे कोणाशी वैर नाही. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला का असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यापूर्वीही ग्रामीण परिसरातील शिवसेना पदाधिका-यांवर हल्ला करण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
 

Web Title: Dombivliit Shiv Sena vice-president attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.