Dombivli flyover will be closed for heavy vehicle from tomorrow | उद्यापासून डोंबिवलीचं उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी होणार बंद
उद्यापासून डोंबिवलीचं उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी होणार बंद

ठळक मुद्देअवजड वाहने ठाकुर्ली येथील उड्डाणपुलावरून वळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी लोकमतला दिली.

डोंबिवली - धोकादायक डोंबिवलीचा उड्डाणपूल शुक्रवारपासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी लोकमतला दिली. त्यानुसार उद्यापासून ठाणे येथील वाहतूक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या बदलानुसार अवजड वाहनांच्या मार्गिकेत बदल करण्यात येणार आहेत. अवजड वाहने ठाकुर्ली येथील उड्डाणपुलावरून वळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अवजड वाहनचालकांची गैरसोय होणार असून ठाकुर्ली परिसरात आगामी काळात प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे त्या भागातील वाहतूक नियोजन कसे करणार हा मोठा प्रश्न तेथील स्थानिकांना पडला आहे.

Web Title: Dombivli flyover will be closed for heavy vehicle from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.