Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:04 IST2025-10-03T17:02:35+5:302025-10-03T17:04:17+5:30
Dombivli Crime News: डोंबिवलीतील खोणी पलावातील कासा एड्रियाना सोसायटीमध्ये ही घटना घडला. मोबाईलचा पासवर्ड बदलण्यावरून हा कुटुंबातील लोकांनीच एकमेकांना बेदम मारहाण केली.

Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
Dombivli Crime Latest News: मोबाइलचा पासवर्ड बदलल्याच्या कारणावरून कुटुंबात मोठा राडा झाला. खोणी पलावातील कासा एड्रियाना सोसायटीत ही घटना घडली. यात २४ वर्षीय मुलगा आणि त्याची ४७ वर्षीय आई गंभीर जखमी झाली असून, हल्ला करणाऱ्या २६ वर्षीय भावासह ७६ वर्षीय आजोबावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिकाशकुमार यादव याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारा बिकाशकुमार कासा एड्रियाना येथे आई रेणू, मोठा भाऊ आकाशकुमार, आजोबा राजेंद्र राय, आजी मालतीदेवी यांच्यासह राहतो.
आजोबा राजेंद्र हे सेवानिवृत्त आहेत. त्यांना निवृत्ती वेतन मिळते. भाऊ आकाशकुमार हाही कामाला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास आजोबा राजेंद्र यांना मोबाईलचा पासवर्ड कोणी बदलला, असा रेणू यांना जाब विचारला.
तवा, लाटणे घेऊन मारहाण
तवा, लाटणे हाणामारीसाठी वापरण्यात आले. यात बिकाशकुमार गंभीर जखमी झाला. आई रेणू भांडण सोडविण्यासाठी मधे पडली तर तिच्यावरही आकाशकुमारने हल्ला चढविला.
आजोबा राजेंद्र यांनीही चामडी पट्ट्याने रेणू यांना मारहाण केल्याचे बिकाशकुमार याने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. यादव यांच्या घरातील भांडणाचा आवाज ऐकून रहिवासी धावून आले.
बिकाशकुमारसह आई रेणू यांना रुग्णालयात हलविले. भाजप पदाधिकारी मनीषा राणे यांनी हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.