शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

ठाण्यातील पडवळनगरमध्ये टेम्पोच्या धडकेत श्वानाचा मृत्यु: चालकाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 25, 2018 08:05 IST

टेम्पोच्या धडकेत एका श्वानाचा मृत्यु झाल्याने टेम्पोचालक रामसुबक विश्वकर्मा याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. श्वानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळच्या रुग्णालयात पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देअपघातानंतर चालक झाला होता पसारमुंबईतील प्राणी कल्याण अधिका-यांनी घेतली दखलश्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जितेंद्र कालेकरठाणे: वागळे इस्टेट पडवळनगर भागातून जाणा-या एका टेम्पोने चिरडल्याने रस्त्यावरील भटक्या श्वानाचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पोचालक रामसुबक तिलकराम विश्वकर्मा याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.पडवळनगर भागातील भंगारवाडी शिवराजनगर येथील रस्त्यावरुन विश्वकर्मा दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आपला टेम्पो घेऊन जात होता. त्याचवेळी टेम्पोच्या धडकेने रस्त्यावरील हा भटका श्वान गंभीर जखमी झाला. टेम्पोचे चाक पोटावरुन गेल्याने जखमी श्वानाचा काही वेळातच मृत्यु झाला. दरम्यान, घटनेचे प्रत्यक्षदर्शी राधेशाम यादव यांच्यासह अनेकांनी ठाण्यातील प्राणी मित्र तथा सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पवार आणि प्राणी कल्याण अधिकारी (मुंबई उच्च न्यायालय नियुक्त) बिमलेश नवानी यांना याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर नवानी (रा. चेंबूर,मुंबई ) यांनी याप्रकरणी रात्री ९ वाजताच्या दरम्यान टेम्पो चालक विश्वकर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांनी या श्वानाला तपासून तो मृत पावल्याचे घोषित केले. अपघातानंतर अंतर्गत रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यु झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच पोलीस निरीक्षक सुनिल पंधारकर, उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने विश्वकर्मा याला अटक केली. श्वानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.‘‘ चालकांनी वाहन चालवितांना रस्त्यावरील मनुष्य किंवा कोणत्याही प्राण्याला इजा होईल अथवा त्याचा मृत्यु होईल इतक्या बेदरकारपणे वाहने चालवू नयेत. कोणत्याही प्राण्याचा जीव हा मनुष्य प्राण्याइतकाच मूल्यवान आहे. त्यामुळे चालकांनी कोणाचा जीव जाईल, अशा हयगयीने वाहने चालवू नये, असे कळकळीचे आवाहन आहे.’’वैशाली पवार, सामाजिक कार्यकर्त्या, ठाणे

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातCrimeगुन्हा