शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

मुजोर व्यापारी, मठ्ठ प्रशासनामुळे ‘डर्टी पिक्चर’

By admin | Updated: March 24, 2017 01:11 IST

लोकानुनयी धोरणे घेत करवाढ व करवसुलीत नगरसेवकांचा वरचेवर सुरू असणारा हस्तक्षेप, भरमसाट नफा कमवूनही महापालिकेचे

ठाणे : लोकानुनयी धोरणे घेत करवाढ व करवसुलीत नगरसेवकांचा वरचेवर सुरू असणारा हस्तक्षेप, भरमसाट नफा कमवूनही महापालिकेचे कर भरण्यास खळखळ करणारे मुजोर व्यापारी आणि करवसुलीची असाध्य लक्ष्ये निश्चित करून वसुलीसाठी ‘कचरा फेको’ सारखे आचरट प्रयोग राबवणारे मठ्ठ प्रशासन, अशा गदारोळामुळे स्मार्ट ठाणेकर होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना गुरुवारी शहरातील प्रमुख बाजारपेठेत कचऱ्याची डर्टी पिक्चर्स दिसली. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने करवसुलीकरिता ‘कचरा फेको’ आंदोलनाचा आचरट प्रयोग सर्वप्रथम केला व मुखभंग करून घेतला. त्यातून धडा घेण्याऐवजी ठाणे महापालिका प्रशासनाने त्याचीच री ओढत ठाण्यातील व्यापाऱ्यांसमोर कचरा टाकून स्वत:ची शोभा करून घेतली. करवसुली हे जसे महापालिकेचे कर्तव्य आहे तसेच शहर स्वच्छ ठेवणे, हेही महापालिका प्रशासनाचेच कर्तव्य आहे. करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर कधी बॅण्डबाजा वाजव किंवा तृतीयपंथी नाचव, असे प्रयोग करण्याच्या साहसवादापोटी प्रशासनाकडून ही कर्तव्यच्युती घडल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे.व्यापारी त्यांच्या महागड्या शोरूमचे लक्षावधी रुपयांचे भाडे भरतात. तशी त्यांची दुकाने वर्षानुवर्षे सुरू आहेत, म्हणजेच त्यांना रग्गड नफा कमवणे शक्य होत आहे. असे असताना स्वत: केलेला कचरा उचलण्याकरिता कर भरण्यास विरोध करणे, ही व्यापाऱ्यांची मुजोरी आहे. पालिकेने या व्यापाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत कारवाई करून त्यांना तुरुंगाची हवा खायला लावायला हवी होती. मात्र, तसे न करता त्यांच्या दुकानांसमोर कचरा टाकल्याने विनाकारण त्यांना बोंब मारण्याची संधी दिली. यात नगरसेवक सर्वात दोषी असल्याचे ठाणेकरांचे मत आहे. वेळोवेळी थोडी करवाढ करून विश्वस्त या नात्याने पालिकेची आर्थिक काळजी न वाहता लोकानुनयी भूमिका घेत करवाढीला विरोध करण्याच्या धोरणांमुळे महापालिका अडचणीत सापडल्या आहेत. (प्रतिनिधी)