ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 17:06 IST2025-08-10T17:05:54+5:302025-08-10T17:06:17+5:30

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा

Dharmendra wins men's category, Raveena Gaikwad wins women's category in Thane Municipality's 'Varsha' marathon | ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

ठाणे: 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतिसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या एएसआयच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले. त्याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी ०१ तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.

कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार सकाळी आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला.

ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले. ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही उर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच 'मॅरेथॉन ठाण्याची…उर्जा तरुणाईची’असे घोषवाक्य घेतले आहे. तू धाव, तू धाव...घे क्षितिजाचा ठाव हे गाणेही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू होत होत आहे. त्यामुळे ठाण्याचे रुप आणखी बदलेल. आपले ठाणे हरित होत आहे. यंदा दोन लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • खेळाडूंचा सत्कार- याप्रसंगी, इंग्लड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, आतंरराष्ट्रीय अॅथलिट शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल्ल आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  • घरोघरी तिरंगा प्रतिज्ञा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळयांनी याप्रसंगी, घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली.
  • कॉर्पोरेट रन- महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक कि.मी ची 'कॉर्पोरेट रन' ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला.  त्याचप्रमाणे, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या  त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला.
  • एकूण १० लाखांची बक्षिसे- ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात झाली. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची  रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.


स्पर्धेचा निकाल

पुरुष खुला गट - अंतर २१ किमी

१. धर्मेंद्र, एसएसआय, पुणे
२. अंकुश हक्के, सांगली
३. कमलाकर देशमुख, नाशिक
४. बेलिअप्पा एपी, एसएसआय, पुणे 
५. सचिन यादव, मुंबई उपनगर
६. राज तिवारी, मुंबई
७. इश्वर झिरवाल, नाशिक
८. धुलदेव घागरे, सांगली
९. अमोल अमुने, सोलापूर
१०. सिद्धेश बर्जे, रत्नागिरी

महिला खुला गट - अंतर २१ किमी

१. रविना गायकवाड, नाशिक
२. आरती पवार, नाशिक
३. साक्षी जड्याल, रत्नागिरी
४. ऐश्वर्या खलाडकर, पुणे
५. रुक्मिणी भोरे, पालघर
६. अभिलाषा मोडेकर, पुणे
७. प्रियांका पैकाराव, ठाणे
८. प्रतिक्षा चोरमले, मुंबई
९. आंचल मारवा, मुंबई
१०. उर्मिला बने, मुंबई

पुरुष, १८ वर्षावरील, १० किमी

१. चैतन्य रुपनेर, सांगली
२. अतुल बरडे, नाशिक
३. वैभव शिंदे, नाशिक
४. आशुतोष यादव, मुंबई
५. प्रतिक डांगरे, पालघर
६. मन्नू सिंग, ठाणे
७. हितेश शिंदे, मुंबई
८. हर्षा चौहान, मुंबई
९. दत्ता आढाव, परभणी
१०. सूरज झोरे, सातारा

महिला, १६ वर्षावरील, १० किमी

१. साक्षी भंडारी, अहिल्यानगर
२. मानसी यादव, पुणे
३. रिनकी पवार, नाशिक
४. शेवंता पवार, धुळे
५. आरती भगत, नागपूर
६. मोनिका सिंग, मुंबई
७. प्रियांका कुपते
८. आदिती पाटील, ठाणे
९. प्रियांका देवरे, नाशिक
१०. जयश्री कुंजरा, पालघर

मुले, १८ वर्षाखालील, १० किमी

१. रोहित संगा
२. विवेक शाह
३. ओंकार सावंत
४. आदित्य यादव
५. कृष्णा जाधव
६. आशिष गौतम
७. अनुप प्रजापती
८. विघ्नेश पाटील
९. दुर्वेश पाटील
१०. निशू शर्मा

मुले, १५ वर्षाखालील, ०५ किमी

१. आशिष राजबर
२. रुद्र घाडगे
३. कयान चव्हाण
४. ओंकार भट
५. सर्वेश लावंड
६. आयान पिंजारी
७. आर्यन वेखंडे
८. हर्षवर्धन सुर्वे
९. रोहीत राठोड
१०. प्रतिक खानसोळे

मुली, १५ वर्षाखालील, ०५ किमी

१. अल्येस लोपेझ
२. अल्विना मॅट्स
३. श्रेया ओझा
४. जस्लीन शैजू
५. भक्ती कदम
६. बुर्शा शेख
७. मानसी कांबळे
८. नेहा हलगरे
९. वंशिका जंगम
१०. प्रिती शहा

मुले, १२ वर्षाखालील, ०३ किमी

१. आराध्य पाटील
२. रिधम साईल
३. पवन वर्मा
४. तेजप्रताप कुमार
५. जेकब मेयन
६. दक्ष दळवी
७. सार्थक यादव
८. अयन पांडे
९. मारुती वर्मा
१०. अर्णव अडसुळ

मुली, १२ वर्षाखालील, ०३ किमी

१. ओवी पाटील
२. जान्हवी गुंजाळ
३. अभिगेल गॅरजल
४. आहाना निरंकारी
५. रिया गोसावी
६. तन्मयी भोईर
७. स्तुती फातर्फेकर
८. अद्विका घोळे
९. अनन्या प्रसाद
१०. अनघा भोईर

पुरुष - ६० वर्षांवरील, ०१ किमी

१. नारायण कंदमवार
२. सुधाकर शिंदे
३. एकनाथ पाटील
४. अशोक भोगले
५. पुनाजी सातव

महिला - ६० वर्षांवरील, ०१ किमी

१. आशा पाटील
२. रेखा ताम्हाणेकर
३. प्राची वाघ
४. शुभांगी भोगले
५. साधना दलाल

कॉर्पोरेट रन, अंतर ०१ किमी

१. दिलीप शिंदे
२. प्रकाश साईल
३. स्मिता काजवे
४. हर्षल  पाटील
५. श्रीकांत आंबाडे

Web Title: Dharmendra wins men's category, Raveena Gaikwad wins women's category in Thane Municipality's 'Varsha' marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.