मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर कल्याणमध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:19 IST2019-11-23T17:19:03+5:302019-11-23T17:19:12+5:30
भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर कल्याणमध्ये जल्लोष
कल्याण: भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कल्याणमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोश केला.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करण्यात आला. कल्याणमध्ये देखील भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोष करण्यासाठी जमले. यावेळी पोलिसांनी मज्जाव केल्याने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या प्रतिमेला हार घालत पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
दरम्यान काही अतिउत्साही पदाधिकारी, महिला पदाधिकारी चक्क चपला घालून चौथऱ्यावर हजेरी लावत घोषणाबाजी केली. अतिउत्साहि कार्यकर्त्यांच्या वर्तणुकिमुळे शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर जमावबंदीची नोटीस देऊनही जल्लोष करणाऱ्या माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते.