ठाणे जिल्हातील प्रतिपंढरपूर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:43 IST2025-07-06T18:42:42+5:302025-07-06T18:43:05+5:30

ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर शहाड येथील बिर्ला मंदिरात आषाडी एकादशी निमित्त पहाटेपासून भक्तांनी एकच गर्दी केली...

Deputy Chief Minister Eknath Shinde visited the Shahad Birla Vitthal Temple in Pratipandharpur, Thane district | ठाणे जिल्हातील प्रतिपंढरपूर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

ठाणे जिल्हातील प्रतिपंढरपूर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

उल्हासनगर : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात भक्तांची एकच गर्दी झाली. पहाटे शासकीय उल्हासनगर व कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या हस्ते पूजा झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिर्ला विठ्ठल मंदिरात महापूजा केली. ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर शहाड येथील बिर्ला मंदिरात आषाडी एकादशी निमित्त पहाटेपासून भक्तांनी एकच गर्दी केली. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब पहाटे पाच वाजता विठ्ठल-रुख्मिणीची अभिषेक व शासकीय महापूजा केली. जिल्हातील विविध भागातून विठ्ठल नामाचा जयघोष करून दिंड्या बिर्ला मंदिरकडे आल्या आहेत. मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात न्हाहाल्याचे दिसून आले. या महापूजेस सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे, श्रीकांत गोरे, जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका, अनिल व्यास आदी जण उपस्थित होते. मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विठ्ठलनामाच्या जयघोषात, भक्तांनी आपल्या श्रद्धेचं दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिर्ला कॉलेज, संच्युरी शाळा आदींनी काढलेल्या ज्ञान दिंडीला हजेरी लावत दिंडीला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शहरातील बिर्ला विठ्ठल मंदिरात महापूजा केली. यावेळी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, प्रमोद हिंदुराव, उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन, दिलीप गायकवाड आदी जण उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कोणतेही राजकीय भाष्य टाळून ज्ञान दिंडी व बिर्ला मंदिर प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. आषाढी एकादशी निमित्त उल्हासनगर शहाड गावठण परिसरात एक भक्तिपूर्ण, मंगलमय आणि संस्मरणीय पर्व ठरले

Web Title: Deputy Chief Minister Eknath Shinde visited the Shahad Birla Vitthal Temple in Pratipandharpur, Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.