शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

मंदीमुळे नाका कामगारही देशोधडीला; हाताला काम नसल्याने कामगार करताहेत गावांकडे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:09 IST

२५ ते ३० वर्षे शहरात वास्तव्याला असलेला हा कामगार हाताला काम मिळत नसल्याने थोडा का होईना रोजगार मिळेल, या आशेने गावाकडे स्थलांतर करू लागला आहे.

प्रशांत माने कल्याण : नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्याच्या फेऱ्यात बांधकाम क्षेत्राचे आधीच कंबरडे मोडले असताना त्यात आता जागतिक मंदीची भर पडली आहे. परिणामी, बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या नाका कामगारांच्या हातालाही काम राहिलेले नाही. यात त्यांच्यासह कुटुंबाची पुरती आबाळ होत आहे. मंदी आणि त्यात पावसाळ्यात थांबलेल्या बांधकामांमुळे हातावर पोट असलेल्या या नाका कामगारांनी गावाकडे धाव घ्यायला सुरुवात केल्याने हा कामगार देशोधडीला लागल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळत आहे.कल्याण-डोंबिवली शहरांचा विचार करता नाका कामगारांची संख्या २० हजारांच्या आसपास आहे. बिगारी, मिस्त्री, वायरमन, रंगारी, ग्रील, स्लायडिंग, फर्निचर, प्लम्बिंग, पीओपी असे बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत. मिस्त्रीला दिवसभराची मजुरी म्हणून दिवसाला एक हजार तर मदतनीस कामगाराला ५०० रुपये मिळायचे. परंतु, सध्याच्या मंदीमुळे त्यांच्या मजुरीत घट झाली असून, ती ७०० ते ३५० रुपयांपर्यंतच मिळत आहे. प्रारंभी महिनाभरातील २५ ते २७ दिवस काम मिळायचे, पण आता १३ ते १२ दिवसच काम मिळत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न नाका कामगार आणि त्यांच्या कुटुंबापुढे उभा राहिला आहे. कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. अनेकांनी मुलांना खाजगी क्लासला पाठविणेही बंद केले आहे.

२५ ते ३० वर्षे शहरात वास्तव्याला असलेला हा कामगार हाताला काम मिळत नसल्याने थोडा का होईना रोजगार मिळेल, या आशेने गावाकडे स्थलांतर करू लागला आहे. गेल्या दोन वर्षांत ही बिकट परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. शहरात आता कुठेही बांधकामाला वाव नाही. बहुतांश बांधकामे मोकळी जागा असलेल्या ग्रामीण भागात होत आहेत. डोंबिवली शहरात दीड वर्ष बांधकामांचे रजिस्ट्रेशन बंद होते. तेव्हाही बांधकामांअभावी कामगारांचा रोजगार बुडाला होता. पण, सध्या रजिस्ट्रेशन सुरू झाले तरी मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे बँकांकडून त्यांना कर्जपुरवठा केला जात नाही. त्यामुळे बांधकामे खोळंबली आहेत, हे देखील कामगारांच्या उपासमारीला कारण ठरत आहे.

राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यावतीने नाका कामगारांना आर्थिक लाभ दिला जातो. परंतु, या मंडळात कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने हा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत नाही. या मंडळाच्या योजना चांगल्या आहेत. लाखो रुपये पडून आहेत, पण ते कर्मचाऱ्यांअभावी लाभार्थ्यांना मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतकºयांना उन्हाळ्यात काम नसल्याने सरकारने रोजगार हमी योजना काढली आहे. तशी योजना आमच्यासाठीही मंदीच्या काळात सुरू करावी, अशी मागणी नाका कामगारांकडून होत आहे.सरकारने गांभीर्याने दखल घ्यावीमंदीमध्ये नाका कामगारही देशोधडीला लागला, ही वस्तुस्थिती आहे. पण, सरकारच्या बांधकाम कामगार मंडळाद्वारे कामगारांना आर्थिक मदत मिळायची, पण त्या मंडळावर कर्मचारी नसल्याने त्याचा लाभ कामगारांना मिळत नाही. पुरेसा कर्मचारी देण्याबाबत सरकाने तत्काळ कृती करावी. तसेच शेतकºयांप्रमाणे मंदीच्या काळात नाका कामगारांनाही रोजगार हमीसारखी योजना सुरू करावी, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी दिली.घरांच्या किमती उतरल्याने तोटाघरांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे व्यावसायिकही तोट्यात आहेत. २५ लाखांमध्ये मिळणाºया घरांच्या किमती आजघडीला १८ ते २० लाखांपर्यंत खाली उतरल्या आहेत. त्यामुळे मंदीचा फटका व्यावसायिकांनाही चांगलाच बसला आहे. एकीकडे नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्यामुळे अधिकृत बांधकाम करणाºयांना मर्यादा आल्या असताना सरकार बेकायदा बांधकामांकडे कानाडोळा करत आहे. बेकायदा बांधकामे रोखणे हे प्रशासनाचे काम आहे. पण, त्याचे स्तोम दिवसागणिक वाढतच आहे. त्याला कुठलाही कायदा लागू होत नाही. पण, प्रामाणिकपणे व्यवसाय करणाºयांना मात्र कायदा पिळून काढत आहे. जीएसटीमुळे कंबरडे मोडले आहे. नोटबंदीमुळे खेळत्या भांडवलाला मर्यादा पडल्या आहेत. मंदीचा फटका एकीकडे बसत असताना वाहतूककोंडीमुळेही घरांच्या बुकिंगवर परिणाम झाल्याची प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक व एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.