बार - हॉटेलसाठी रात्री दीड पर्यंत परवानगी देण्याची मागणी, तर आयुक्तांनी दिली रात्री १० पर्यंतची वेळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 07:13 PM2020-10-08T19:13:31+5:302020-10-08T19:14:29+5:30

Mira Bhayander News : गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांनी आदेश काढून सकाळी ८ ते रात्री १० वाजे पर्यंत हॉटेल, बार , फूडकोर्ट ना परवानगी दिली आहे . 

Demand for permission for Bar-hotel till midnight, while the commissioner gave time till 10 pm | बार - हॉटेलसाठी रात्री दीड पर्यंत परवानगी देण्याची मागणी, तर आयुक्तांनी दिली रात्री १० पर्यंतची वेळ  

बार - हॉटेलसाठी रात्री दीड पर्यंत परवानगी देण्याची मागणी, तर आयुक्तांनी दिली रात्री १० पर्यंतची वेळ  

Next

मीरारोड - मीरा भाईंदर मधील बार व हॉटेल रात्री दिड वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी काशिमीरा होस्पिटॅलिटी एन्ड एंटरटेनमेंट ह्या  ऑर्केस्ट्रा बार , बार - हॉटेल व लॉज संघटनेने मागितली  . तर गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांनी आदेश काढून सकाळी ८ ते रात्री १० वाजे पर्यंत हॉटेल, बार , फूडकोर्ट ना परवानगी दिली आहे . 

संघटनेचे सचिव उदय शेट्टी ह्यांनी पालिका आयुक्त डॉ . विजय राठोड ह्यांना पत्र देऊन बार - हॉटेल चालू ठेवण्याची वेळ रात्री दिड वाजे पर्यंत वाढवून देण्याची मागणी केली आहे . सुरवातीला सायंकाळी ७ पर्यंतच परवानगी असल्याने ग्राहक सायंकाळी ७ नंतर येतात . कोरोना संसर्गा मुळे गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना हॉटेल सुरु होणार म्हणून आम्ही स्वखर्चाने परत आणले आहे . पण हॉटेल ७ वाजे पर्यंतच सुरु ठेवण्याची मुदत असेल तर आणखी आर्थिक संकटात हॉटेल व्यवसाय जाईल . ७ वाजे पर्यंतच्या वेळे मुळे अनेक हॉटेल व्यवसायीकांनी आपली हॉटेल सुरु केली नसल्याचे शेट्टी म्हणाले . पालिकेने आता गुरुवारी आदेश काढून रात्री १० पर्यंतची वेळ दिली असली तरी रात्री दिड वाजे पर्यंत परवानगी देण्याची बार चालक आदींची मागणी आहे . 

तर कोरोनाच्या संक्रमण काळात ऑर्केस्ट्रा बार ना परवानगी देऊ नयेच शिवाय शहरातील बार - हॉटेल ना सुद्धा रात्री दिड वाजे पर्यंत अजिबात परवानगी देऊ नये अशी मागणी मनसेच्या पदाधिकारी अनु पाटील ह्यांनी केली आहे . रात्री दीड वाजेपर्यंत बार ना परवानगी देणे म्हणजे पुन्हा गैरप्रकार व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्या सारखे असल्याचे पाटील म्हणाल्या .

दरम्यान आयुक्त डॉ . विजय राठोड ह्यांनी गुरुवार ८ ऑक्टॉबर रोजी आदेश काढून हॉटेल , फूड कोर्ट , रेस्टोरेंट , बार साठी सकाळी ८ ते रात्री १० वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे . कंटेनमेंट झोन मधील बार - हॉटेल बंदच राहतील . ५० टक्के क्षमते नुसार तसेच शासनाच्या अटीशर्ती पळून व्यवसाय करायचा आहे .

Web Title: Demand for permission for Bar-hotel till midnight, while the commissioner gave time till 10 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.