शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीतील निर्णयांचा मान राखला जाईल; वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:41 IST

अर्थसंकल्प २०२६ विषयी माहिती देण्यासाठी झालेल्या या पत्रकार परिषदेला उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, तसेच भाजप गटनेते मुकेश मोकाशी यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे : ठाणे महापालिकेत महायुती स्थापन करताना जे काही ठरले होते, त्या चर्चांचा मान राखला जावा आणि ते निर्णय कायम ठेवले जावेत, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. वर्तकनगर येथील भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अर्थसंकल्प २०२६ विषयी माहिती देण्यासाठी झालेल्या या पत्रकार परिषदेला उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, तसेच भाजप गटनेते मुकेश मोकाशी यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाईक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या दिशेने राज्य सरकार वाटचाल करीत असून, मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा आहे. मच्छिमारांसाठी १,२०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, पाणीपुरवठा योजनांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

शहरी भागात १३५ एमएलडी, तर ग्रामीण भागात ५६ एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. वनविभागाच्या कामकाजाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विदर्भातील वाघांच्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरांमध्ये बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी वनखाते सतर्क असून, आतापर्यंत सुमारे ४५० बिबट्यांना पकडण्यात आले आहे. त्यापैकी काहींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, लवकरच ठाणे व पालघर जिल्ह्यात बिबट सफारी उभारली जाणार आहे. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठीही कडक उपाययोजना करण्यात येत असून, पुढील तीन वर्षांत परिस्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वीकृत नियुक्त्यांबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतीलनवी मुंबईतील घडामोडींमुळे ठाणे पालिकेतील विविध समित्या व स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत विचारले असता, नाईक म्हणाले की नवी मुंबईतील परिस्थिती वेगळी आहे. मात्र, ठाणे आणि कल्याण येथे महायुती म्हणून निवडणुका लढविण्यात आल्या असल्याने, त्यावेळी झालेल्या चर्चांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahayuti decisions will be respected: Forest Minister Ganesh Naik's statement.

Web Summary : Forest Minister Ganesh Naik emphasized respecting Mahayuti decisions in Thane. He highlighted the state's commitment to 'Developed India,' infrastructure development, and wildlife conservation, including tiger safaris and addressing leopard presence in urban areas. Senior leaders will decide on appointments.
टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा