शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करून व्यापारी पसार

By admin | Updated: March 24, 2017 01:07 IST

आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या नवी मुंबईतील व्यापाऱ्याचा शोध सुरू आहे.

शेणवा : आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या नवी मुंबईतील व्यापाऱ्याचा शोध सुरू आहे. बेलकडी तसेच गांगणवाडी येथील आदिवासी शेतकरी मधुकर गावंडा, शरद गावंडा, महादू गावंडा आणि भाऊ गांगड यांनी शेतजमीन भाडेतत्त्वावर घेत काकडी लागवड केली. बेरोजगारीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हे पिक घेतले होते. या शेतकऱ्यांनी चांगले पिक यावे म्हणून दिवसरात्र मेहनत घेतली. काकडीचे उत्पादन नवी मुंबईतील व्यापारी भरत शिंगोटे यांनी रक्कम न देता खरेदी करत तुर्भे बाजारात त्याची विक्री केली. काकडीचे उत्पादन संपुष्टात आल्यानंतर एकूण खरेदी काकडीची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते. त्यानुसार नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांकडून २ लाख ११ हजार ९४३ रुपयांची काकडी खरेदी केली. त्याच्या पावत्याही दिल्या आहेत. काकडीचे उत्पादन महिनाभरापूर्वीच बंद झाले असूनही या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. याबाबतची तक्र ार त्यांनी किन्हवली पोलिसात केली आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर व्यवसाय कसा करावा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. व्यापाऱ्याचा त्वरित शोध घेण्याची मागणी केली. (वार्ताहर)