Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:19 IST2025-11-08T18:13:54+5:302025-11-08T18:19:23+5:30
Dance bar raid in ulhasnagar: उल्हासनगर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री एका बारवर धाड टाकली. अटक करण्यात आलेल्यांची नावे पोलिसांनी सांगितली.

Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
उल्हासनगरमधील कॅम्प नं-१७ सेक्शन येथील चांदणी बारवर मध्यवर्ती पोलिसांनी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) रात्री धाड टाकली. यावेळी पोलिसांनी तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांसह एकूण १५ जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, यापूर्वीही या बारसह अन्य बारवर पोलिसांनी कारवाई केली होती.
उल्हासनगर कॅम्प नं-१७ सेक्शनमधील चांदणी लेडीस सर्व्हिस बार असून बारमध्ये महिला तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव करीत आहेत, अशी माहिती मध्यवर्ती पोलिसांना शुक्रवारी रात्री मिळाली.
माहितीच्या आधारे मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता चांदणी बारवर धाड टाकून कारवाई केली.
पोलिसांनी कोणाला अटक केली?
बारमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील हावभाव करणाऱ्या रिलीमा खातून अयुब अली मोंडल, लक्ष्मी लालप्पा बोडगुट्टा, सीमा विश्वास मलिक, वंदना राजेश अरोरा, कृष्णा राजेश शिंग, काजल धीरेंद्र पटेल, हेमा जमाराम कुमहार, अमिमा वामन दरेकर, सायबा आयुब खान या ९ महिलांना अटक करण्यात आली.
याचबरोबर अश्लील कृत्ये करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल बार मालक सुधीर शिवराम शेट्टी, मॅनेजर दीपक सुरेंद्र मेनन, वेटर प्रभातकुमार रोहित मोर्या, कमलेश सीताराम मिश्रा, रहमद दुलाल खान, अजयकुमार विनोदकुमार मिश्रा अश्या एकूण १५ जणावर गुन्हे दाखल केले.