शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

काळू नदीवरील बंधाऱ्याला गळती?; लाखो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:31 IST

तातडीने डागडुजी न केल्यास पाणीटंचाईची भीती

टिटवाळा : शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी काळू नदीवर टिटवाळा-गुरवली रस्त्यावर लघुपाटबंधारे विभागाने बांधलेल्या के.टी. बंधाºयाला गळती लागली आहे. पाणी अडवून एक महिन्याच्यावर कालावधी उलटून गेला, तरीही यावर संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्यात न आल्याने लाखो लीटर पाणी सध्या येथून वाया जात आहे. त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना न केल्यास मे महिन्याच्या अगोदरच शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता आहे.

काळू नदीवर १९८० मध्ये स्वतंत्र पाणीयोजनेसाठी लघुपाटबंधारे विभागाकडून के.टी. बंधारा बांधण्यात आला. यानंतर, कल्याण-डोंंबिवली महापालिकेने काळू नदीवर २००३ मध्ये सुमारे तीन कोटी रुपये खर्चून साडेसात दशलक्ष क्षमतेची टिटवाळा व मांडा परिसरासाठी स्वतंत्र पाणीयोजना उभारली. महागणपती मंदिराच्याजवळ काळू नदीवर केटी बंधाºयाच्या पाणीसाठ्यावर आधारित ही पाणीयोजना सुरू करण्यात आली. टिटवाळा शहराला दररोज चार एमएलडी इतका पाणीपुरवठा या योजनेतून केला जातो.

मात्र, गेल्या महिनाभरापासून या बंधाºयाच्या बंद केलेल्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. यामुळे ही गळती भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे करू शकते, अशा प्रकारची भीती नगरसेवक संतोष तरे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करणार असल्याचे तरे यांनी सांगितले.

मनसेचे प्रभाग क्र . ९ चे शाखाध्यक्ष मिलिंद सावंत म्हणाले की, ‘या समस्येबाबत संबंधित विभागाकडून नियमित पाहणी तसेच डागडुजी केली जात नाही. त्यामुळे या बंधाºयाला पडलेल्या भगदाडातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तसेच बंधारा कमकुवत होऊन तो तुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची बाब एका निवेदनाद्वारे केडीएमसी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.’दरम्यान, ही गळती अशीच चालू राहिली तर मे महिन्यापूर्वीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असे येथील नागरिक प्रशांत गोडांबे यांनी सांगितले.

काळू नदीवरील के.टी. बंधाºयातून पाणीगळती होत असल्याबाबत आपल्याकडे माहिती आली आहे. यापूर्वी बंधाºयाच्या पिलरला जॅकेटिंग रूअर्टिंग करण्यात आले होते. दुरुस्तीचे काम प्रस्तावित असून ते लवकरच मार्गी लागणार आहे.-पूनम पाटील, अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र