शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:51 AM

गुजरातच्या दिशेने सरकलेल्या ओखी वादळामुळे सतर्कता बाळगावी, अशी सूचना हवामान खात्याने केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.

गुजरातच्या दिशेने सरकलेल्या ओखी वादळामुळे सतर्कता बाळगावी, अशी सूचना हवामान खात्याने केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी जोरदार वाºयासह पाऊस पडेल असा इशारा दिल्याने सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मात्र चिंतातूर झाले आहेत. मच्छिमारांनी आपल्या बोटी वेळेत नांगरल्याने पुढील अनर्थ टळला. पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता. इंटरनेट सेवेतही व्यत्यय आला.उत्तनमध्ये मासेमारी बोटी सुरक्षितभार्इंदर : ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत जेटीजवळ नांगरण्यात आल्या. त्यामुळे तूर्तास त्या सुरक्षित असून किनाºयावरील मासळी सुकवण्याच्या जागेतील साहित्याचे मात्र किरकोळ नुकसान झाल्याचे पाली मच्छिमार सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.ओखी वादळामुळे मासेमारी बोटींना समुद्रात मच्छिमारीसाठी जाण्यास बंदी घातल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारीच जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांना सावधनतेचा इशारा दिला होता. त्यानुसार मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीही पश्चिम किनारपट्टीवरील शहराच्या हद्दीतील भाटेबंदर ते पाली दरम्यानच्या मच्छिमारांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. पालिकेसह जिल्हा प्रशासन व उत्तन-सागरी पोलिसांनी किनाºयाचा ताबा घेत समुद्रात जाणाºयांना रोखले. दर १५ मिनिटांनी वादळाचा वेध घेत किनाºयावरील मच्छिमारांना जागरूक राहण्यासाठी त्याची माहिती दिली जात होती.मंगळवारी मध्यरात्री मोठ्या भरतीमुळे पाण्याची पातळी वाढली होती. मात्र त्यात किनाºयावरील काही साहित्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे डिमेलो म्हणाले. तसेच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून किनाºयावरील मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देणे सुरू होते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी वेळेतच किनाºयावर नांगरण्यात आल्या. तरीदेखील पोलिसांची किनाºयावर गस्त सुरू असून वादळाचा आढावा सतत घेतला जात आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरु झाली.भाजीपाला उत्पादक चिंतातूरअंबाडी : ओखी वादळामुळे मंगळवारी झालेल्या अवेळी पावसाने भाजीपाला उत्पादनावर विपरित परिणाम होणार असल्याने भिवंडी तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. पावसाने खळ््यांवरील न झोडलेले भातपिक व झोडणी झालेल्या भातपिकाचे तण यांचे मोठे नुकसान झाले. तर भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी लागवड केलेल्या विविध पिकांच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होणार असून या हवामान बदलामुळे उत्पादनासाठी तयार भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.बदलापूरमध्ये जनजीवन विस्कळीतबदलापूर : बदलापूर शहरात सोमवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाºयासह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी बदलापूरमध्ये केवळ पावसानेच हजेरी लावली.अवेळी पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले होते. चिखल झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले होते. अनेकांनी कामावर जाण्याचे टाळले. सक्तीची रजा घेऊन नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले.उल्हासनगरमध्ये विजेचा लपंडावउल्हासनगर : मंगळवारी झालेल्या पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर चिखल साचला होता. विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले होते.शहरात सोमवारपासून रिमझिम पावसाने हजेरी लावताच विजेचा लंपडाव सुरू झाला. नागरिकांना सोमवारी रात्री ५ ते ६ तास अंधारात काढावे लागले. मंगळवारीही वीज ये-जा करत होती. शहरातील रस्त्याची दुरूस्ती व खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याने, रस्त्यात रिमझिम पावसाने चिखल झाला. नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन, मोर्यानगरी ते व्हीटीसी ग्राउंड रस्ता, कॅम्प नं-५ येथील मुख्य रस्ता, शहाड ते पालिका रस्ता, डॉल्फिन ते शांतीनगर रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता येथे चिखल झाला होता.शाळांना सुटी दिल्याची कल्पना अनेक विद्यार्थी व पालकांना नसल्याने, ते वेळेत शाळेमध्ये आले. मात्र सुटी असल्याचे समजल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी घरी भिजत जाणे पसंत केले. सुरक्षेचा उपाय म्हणून काही ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवला होता अशी माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ