Crime News: ठाण्यात भाजप प्रवक्त्याला धक्काबुक्की, पत्नीचा विनयभंग; मॉलच्या कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: January 2, 2023 22:44 IST2023-01-02T22:37:37+5:302023-01-02T22:44:11+5:30
Crime News: ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेले भाजपचे एक प्रवक्ते आणि त्यांच्या पत्नी रविवारी खरेदी करून पार्किंगमध्ये आपले वाहन घेण्यासाठी गेले असता तेथील कर्मचा-यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली.

Crime News: ठाण्यात भाजप प्रवक्त्याला धक्काबुक्की, पत्नीचा विनयभंग; मॉलच्या कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
- जितेंद्र कालेकर
ठाणे - ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेले भाजपचे एक प्रवक्ते आणि त्यांच्या पत्नी रविवारी खरेदी करून पार्किंगमध्ये आपले वाहन घेण्यासाठी गेले असता तेथील कर्मचा-यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या पत्नीचा विनयभंग केला. वर्तकनगर पोलिस ठाण्यात अभिजीत पवार या कर्मचाºयाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
घोडबंदररोड भागात राहणारी ही ४६ वर्षांची महिला तिचे पती आपल्या सहा वर्षांच्या मुलासह या मॉलमध्ये खरेदीसाठी १ जानेवारी रोजी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास गेले होते. रात्री १० वाजता खरेदी आटोपल्यानंतर पार्किंगमध्ये या दाम्पत्याला शुल्क वसुलीकरिता अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. आमच्याकरिता बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करा, अशी सूचना करण्यासाठी गेलेल्या या महिलेला धक्काबुक्की करीत पवार हा तिच्या पतीच्या अंगावर धावून गेला. पवार याने विनयभंग केल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.