स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा, महिलांनी भररस्त्याच चोपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 22:51 IST2019-02-02T22:50:37+5:302019-02-02T22:51:19+5:30
स्टेट बँकेचा शाखा व्यवस्थापक जरारे याने त्याच्या दालनात सायंकाळी 5 च्या सुमारास बँकेचे कामकाज बंद असताना एका तरुणीशी लगट करण्याच्या प्रयत्न केला.

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा, महिलांनी भररस्त्याच चोपला
हुसेन मेमन, जव्हार
पालघर - जव्हार-स्टेट बँकेचा माथेफिरु शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर जरारे यांच्यावर एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी भादवीस कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या फिर्यदीनंतर जव्हार पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
स्टेट बँकेचा शाखा व्यवस्थापक जरारे याने त्याच्या दालनात सायंकाळी 5 च्या सुमारास बँकेचे कामकाज बंद असताना एका तरुणीशी लगट करण्याच्या प्रयत्न केला. तरुणीला लज्जा निर्माण होईल अशी वर्तणूक केल्यामुळे त्यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यात 354 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे करीत आहेत. दरम्यान, आरोपीला पोलीस ठाण्यात आणताना रस्त्यातच संतप्त महिलांनी जरारे याची चांगलीच पिटाई केली.