भिवंडी दुर्घटनेप्रकरणी विकासकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:36 AM2020-09-22T07:36:32+5:302020-09-22T07:36:47+5:30

नारपोली पोलिसांत नोंद : जखमींवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Crime against developer in Bhiwandi accident case | भिवंडी दुर्घटनेप्रकरणी विकासकावर गुन्हा

भिवंडी दुर्घटनेप्रकरणी विकासकावर गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा विकासक सय्यद अहमद जिलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नारपोली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३३७, ३३८, ३०४ (२) प्रमाणे जिलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परिसरातील रहिवाशांनी इमारत कोसळल्याचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक मदत करीत असतानाच ठाण्याचे अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला; मात्र जवानांनी भरपावसातही बचावकार्य सुरूच ठेवले. घटनास्थळी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तातडीने पोहोचून परिस्थिती हाताळण्यास मदत केली.


इमारतीच्या ढिगाऱ्याखालून
हैदर सलमानी (२०), रुख्सार कुरेशी (२६), मोहम्मद अली (६०), शब्बीर कुरेशी (३०), मोमीन शमीऊल्ला शेख (४५), कैसर सिराज शेख (२७), रुख्सार जुबेर शेख (२५), अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (१८), आवेश सरोजुद्दीन अन्सारी (२२), जुलेखा अली शेख (५२), उमेद जुबेर कुरेशी (४), आमीर मोबिन शेख (१८), आलम अन्सारी (१६), अब्दुल्ला शेख (८), मुस्कान शेख (१७), नसरा शेख (१७), इब्राहिम (५५), खालिद खान (४०), शबाना शेख (५०) आणि जरीना अन्सारी (४५) इत्यादी जखमींना बाहेर काढण्यात आले.
याशिवाय, झुबेर कुरेशी (३०), फायजा कुरेशी (५), आयशा कुरेशी (७), बब्बू (२७), फातमा जुबेर
बब्बू (२), फातमा जुबेर कुरेशी (८), उजेब जुबेर (६), अस्का आबिद अन्सारी (१४), अन्सारी दानिश अलिद
(१२), सिराज अहमद शेख (२८),
नाजो अन्सारी (२६) आणि सनी मुल्ला शेख (७५) अस्लम अन्सारी (३०) आणि नजमा मुराद अन्सारी (५२) इत्यादी रहिवाशांचे मृतदेह आतापर्यंत काढण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य अद्यापही सुरूच असून, जखमींवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
च्भिवंडी : येथील इमारत दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वट करून दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांबाबत त्यांनी सहानुभूती व्यक्त केली. त्याचबरोबर बचावकार्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
च्केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करून, इमारत कोसळून जखमी झालेले रहिवासी लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील फेसबुकच्या माध्यमातून या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
च्याबाबत आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून बचावकार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

प्रसंगावधानाने वाचले रहिवाशांचे प्राण
या दुर्घटनेतून थोडक्यात वाचलेल्या आणि स्वत:सोबत इतर रहिवाशांचाही जीव वाचवणाºया शरीफ अन्सारी
यांनी या थराराबाबत ‘लोकमत’ला माहिती दिली. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास बाजूच्या सदनिकेत राहणाºया माझ्या मित्राने आवाज देऊन इमारतीला तडे गेल्याचे सांगितले. मी लगेच उठून बघितले असता, लादीला व भिंतीला मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचार
1घटनास्थळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी
भेट दिली. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाला
प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत
उपचार करण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली.
2भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. भिवंडीत अनेक ठिकाणी अशा धोकादायक व अनधिकृत इमारती आहेत. त्यामुळे भिवंडीत क्लस्टर योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी आपण सुरुवातीपासूनच करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली.
3भिवंडी महापालिका प्रशासन धोकादायक इमारतींना केवळ नोटीस देऊन हात झटकण्याचे काम करीत आहे. सरकार अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांची राहण्यासाठी इतर कोणतीही व्यवस्था करीत नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

Web Title: Crime against developer in Bhiwandi accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.