शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

पुतणीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या चुलत्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 22:17 IST

अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाºया एका ५६ वर्षीय चुलत्याला ठाणे न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची तसेच २२ हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. तिच्यावर या चुलत्याने सहा वर्षांपूर्वी वेगवेगळया ठिकाणी अत्याचार केले होते. हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णय मुंब्रा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्वत:च्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाºया एका ५६ वर्षीय चुलत्याला ठाणेन्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची तसेच २२ हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. तिला दहाव्या मजल्यावरुन फेकून देऊन ठार मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत मारहाण करुन तिच्यावर या चुलत्याने सहा वर्षांपूर्वी वेगवेगळया ठिकाणी अत्याचार केले होते.
हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पिडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरु असतांना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये आणि माथेरानमधील एका घरामध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पिडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. तिच्या तक्र ारीनंतर या नराधम चुलत्याविरुद्ध ६ जून २०१४ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला लगेचच अटक केली होती. तपासाअंती याप्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. बुधवारी या खटल्याची सुनावणी झाली. ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सर्व बाजू पडताळून आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षांच्या कारावासाची आणि २२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वला मोहोळकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयRapeबलात्कार