शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिकेच्या जाहिरात विभागात २१ लाखांचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:11 IST

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या जाहिरात विभागात २१ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केला आहे. यासंदर्भातील पुरावेदेखील त्यांनी मनपा आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीसोबत दिले आहेत.भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नियोजित ठिकाणावर जाहिरात, आकाश चिन्ह (होर्डिंग) फलक प्रसिद्ध करण्याचा अधिकार कामाचा ठेका मे. ब्लू. आय. मार्केटिंगचे मालक अजित घाडगे यांना दिला होता. १ नोव्हेंबर २०१४ ते ७ नोव्हेंबर १७ या चार वर्षांच्या कालावधीसाठी तो देण्यात आला होता. विशेष म्हणजे या चार वर्षांत या ठेकेदाराने महापालिकेने केलेल्या करारनाम्यानुसार भाड्यापोटी २१ लाख ४९ हजार ५८६ रुपये महापालिकेला भाडेपोटी भरणे गरजेचे होते. मात्र, घाडगे यांनी यापैकी एक रुपयाही महापालिकेला भरलेला नाही. त्यामुळे या ठेक्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, जाहिरात विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्याला खतपाणी मिळत असल्याचा आरोप मनविसेनेचे परेश चौधरी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.यासंदर्भात अनेक प्रश्न करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांची मालमत्ता जप्त का केली नाही, भाडे थकवलेप्रकरणी फौजदारी कारवाई का केली नाही, करारनाम्याच्या कलम ४ अन्वये द्वितीय पक्ष हप्त्याची रक्कम प्रत्यक्ष जमा करेपर्यंत प्रतिवर्षीप्रमाणे १८ टक्के दराने व्याज देणे बंधनकारक असताना, त्याच्याकडून व्याजाची वसुली का केली नाही, असे अनेक प्रश्न निवेदनात मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे विचारले आहेत. 

टॅग्स :MNSमनसे