शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत नगरसेवक आक्रमक

By admin | Updated: November 5, 2015 00:42 IST

अनधिकृत बांधकामांसंदर्भात पालिका आयुक्तांनी तीन नगरसेवकांचे पद रद्द केल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. अशा पद्धतीने जर कारवाई करायची असेल तर

ठाणे : अनधिकृत बांधकामांसंदर्भात पालिका आयुक्तांनी तीन नगरसेवकांचे पद रद्द केल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. अशा पद्धतीने जर कारवाई करायची असेल तर सर्वांवरच कारवाई करा, असा सूर नगरसेवकांनी आळवला. आज ७० टक्के नगरसेवक अनधिकृत बांधकामांत राहतात. तर, त्यांच्यावरही सरसकट कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मनसेचे शैलेश पाटील, शिवसेनेचे राम एगडे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर साळवी यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. तसेच आणखी पाच ते सहा नगरसेवकांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, अशा प्रकारे भीती दाखवायची असेल तर तीन जणांवर कारवाई करण्यापेक्षा एकाच वेळी सर्वांवर कारवाई करावी, असे मत काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी व्यक्त केले. आज ६५ ते ७० टक्के नगरसेवक हे अनधिकृत बांधकामांत राहतात, म्हणून काय आता त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी केला. नगरसेवकांप्रमाणे मतदारही अनधिकृत बांधकामात राहतात, मग त्यांचे काय करणार, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी केला. या उलट ज्या अधिकाऱ्यांमुळे शहरात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत, त्यासंदर्भात नगरसेवक अथवा सर्वसामान्य ठाणेकर तक्रार करूनही त्या बांधकामांवर कारवाई होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का नाही, असा भेदभाव कशासाठी, असा सवालही काही सदस्यांनी केला. अनधिकृत बांधकामांत ज्या पद्धतीने नगरसेवकांना दोषी मानले जात आहे, त्याप्रमाणे अधिकारीही त्याला तितकेच दोषी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)