शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

coronavirus: लॉकडाऊनमुळे गावी रंगला विवाह सोहळा, कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलिंगवरून दिले आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 10:07 PM

लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे रविवारी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहू न शकलेल्या ठाण्यातील कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्यावर अक्षता टाकल्या.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे - लॉकडाऊनमुळे सोलापूर येथे रविवारी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहू न शकलेल्या ठाण्यातील कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्यावर अक्षता टाकल्या. तसेच नवविवाहित जोडप्यांना त्यांनी शुभाशीर्वाद ही दिले. विशेष म्हणजे हे कुटुंब मास्क घालून आणि फिजिकल डिस्टनसिंग ठेवून स्वतःच्या घरात उभे होते आणि मोबाईलवरून संपूर्ण विवाह सोहळा पाहत होते. 

ठाणे पूर्व येथील कोपरी कॉलनीतील पीडब्लूडी चाळीत राहणारे मनेश सूत्रावे यांचा सोलापूर येथील मावस भाऊ विशाल केकडे याचा साताऱ्याची श्रद्धा जवंजाळ हिच्यासोबत रविवारी दुपारी सोलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी विवाह सोहळा योजिला होता. या आधी एप्रिल महिन्यात या दोघांचा विवाह ठरविण्यात आला होता. लग्नपत्रिका देखील छापायला गेल्या होत्या परंतु लॉकडाऊनमुळे पत्रिकासह विवाह सोहळा देखील त्यांना रद्द करावा लागला. त्यानंतर वधू - वराच्या कुटुंबांनी 14 जून ही तारीख ठरवली. डिजिटल पत्रिका तयार करून ती व्हाट्सएपच्या माध्यमातून मोजक्याच नातेवाईकांना पाठविण्यात आली. हा सोहळा त्यांनी कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले. विवाह सोहळ्यात उपस्थितांना मास्क वाटप करण्यात आले तसेच, त्यांना सॅनेटायझर देण्याची सोय ही केली.

लॉकडाऊनमुळे अनेकांना विवाह सोहळ्याला जाणे तिथे शक्य नव्हते. त्यात कोपरीतील सूत्रावे कुटुंब देखील लॉकडाऊनमुळे घरातच अडकले म्हणून या कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातूनच विवाह सोहळा पाहण्याचे ठरविले. सूत्रावे यांची मुले मात्र आपल्या लाडक्या काकाचे लग्न पाहण्यासाठी लग्नाचे कपडे घालून नटून थटून त्यांच्यावर अक्षता टाकायला उभी राहिली होती. मनेश सूत्रावे, यांची पत्नी, दोन मुले, भाऊ आणि त्याचा मुलगा असे मंगलाष्टके होइपर्यंत आपल्याच घरक्त उभे राहून वधू वरावर अक्षता टाकत होते. दोघांनी एकमेकांना हार घातल्यावर घरातूनच टाळ्या वाजविल्या असे मनेश यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेSolapurसोलापूरmarriageलग्न