शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

Coronavirus: लॉकडाऊनमध्येही 'तो' सांभाळायचा मद्यपींची मने; दुकानात आढळला विदेशी दारुचा साठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:55 PM

मनाई आदेशाचा भंग करून मद्य विक्री करणाऱ्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

वसई - लॉकडाऊन मध्ये विदेशी कंपन्यांच्या वेगवेगळ्या बिअर्सची चोरून विक्री करून मद्यपींची मने सांभाळणाऱ्या वसई कोळीवाडया मधील एका 23 वर्षीय तरुणांवर वसई पोलिसांत विविध कलमानव्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर सोमवार दि.12 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाई दरम्यान वसई पोलिसांनी त्या तरुणाच्या दुकानांतील एक्केचाळीस हजार रूपयांचा मद्याचा साठा देखील अन्य मुद्देमाल सहित जप्त केला असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत"ला दिली. जफर अली शिराज शेख वय 23  वर्षे असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो वसई गावातील रहिवासी आहे.वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने देशात मद्यविक्री पूर्ण बंद आहे.सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व पातळीवर केंद्र व राज्य सरकार व त्यांचे पोलीस प्रशासन नागरिकांना कळकळीचे आवाहन करीत "घरी बसा कोरोनाला टाळा " अशा नानाविध उपाय योजनेत व्यस्त असताना विदेशी कं.च्या बिअर्सची चोरून विक्री सुरु असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षकांना मिळाली असता, पोलिसांनी साईदत्तनगर,कोळीवाडा,फलक आर्ट शॉप ,वसई येथे आरोपी जफर शेख (23) आपल्या ताब्यातील प्रोव्हीबीशन माल बाळगून तो विक्री करीत असताना तसेच संगणकावर ऑनलाईन प्रोव्हीबीशन मालाचा हिशोब करीत असताना तो मिळून आला.

त्याच्याजवळ अनुक्रमे

1) रु.9360 /- बडवायझर बिअर्सचे एकूण 4 बॉक्स

२) रु.6300 /- ट्युबर्क क्लासिक बिअर्सचे एकूण 3 बॉक्स

3) रु.3800 /-ट्युबर्क ग्रीन बिअर्स चे एकूण 2 बॉक्स मध्ये 24 बाटल्या

4)रु.4680 /- हॅनिकेन लार्जर बिअर्स चे एकूण 2  बॉक्स

5)रु.2100 /-हॅनिकेन लार्जर चा 1   बॉक्स त्यामध्ये एकूण 12 बाटल्या

6) रु.15,000 /-डेल कं.चा मॉनिटर व सीपीयू,किबोर्ड असा एकूण मिळून रु.41240 /- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.            या प्रकरणी वसई पोलिसांनी आरोपी विरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.क्रं.176/2020 प्रमाणे भा.दंड.वि.कलम188,269 आप्पती व्यवस्थापन अधि.51 (ब) ,महाराष्ट्र दारूबंदी अधि.65 (फ )तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधि.1897 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाई मध्ये वसई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शखाली वसई पोलीस ठाण्याचे अधिकारी -कर्मचारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसliquor banदारूबंदी