coronavirus: विनापरवाना परराज्यात निघालेले टेम्पो पकडले, तीन टेम्पोंमध्ये भरले होते ९८ परप्रांतीय प्रवासी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:05 AM2020-05-11T03:05:36+5:302020-05-11T03:06:01+5:30

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी व अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर शनिवारी नाकाबंदीदरम्यान माणिकपूर पोलिसांकडून कसून तपासणी सुरू होती. यादरम्यान तिन्ही टेम्पोंची तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

coronavirus: Unlicensed foreign tempo caught, three tempos filled with 98 foreign migrants | coronavirus: विनापरवाना परराज्यात निघालेले टेम्पो पकडले, तीन टेम्पोंमध्ये भरले होते ९८ परप्रांतीय प्रवासी  

coronavirus: विनापरवाना परराज्यात निघालेले टेम्पो पकडले, तीन टेम्पोंमध्ये भरले होते ९८ परप्रांतीय प्रवासी  

Next

वसई : सर्वत्र लॉकडाउन सुरू असताना विनापरवाना ९८ नागरिकांना भरून उत्तर प्रदेशकडे निघालेले तीन टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. परराज्यात स्थलांतर करण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांची कुठलीही लेखी परवानगी न घेता, प्रवासी वाहतुकीसंदर्भातील सवलतीचा गैरवापर घेतल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात टेम्पोचालक-मालकांसह क्लीनरवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनसिटी व अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर शनिवारी नाकाबंदीदरम्यान माणिकपूर पोलिसांकडून कसून तपासणी सुरू होती. यादरम्यान तिन्ही टेम्पोंची तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा व वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे, मात्र परराज्यातील प्रवाशांचे स्थलांतर व वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट आहे. परंतु, प्रशासनाने दिलेल्या सवलतीचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून, कायदा मोडून परराज्यातील लोकांची विनापरवानगी टेम्पोतून वाहतूक होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात, तालुक्यात प्रवेश करणाºया व बाहेर जाणाºया प्रत्येक तपासणीनाक्यांवर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
माणिकपूरचे पोलीस शिपाई शिवाजी डोळे सनसिटी पॉइंटवर नाकाबंदी वेळी शनिवारी उभे असताना त्यांनी सनसिटी येथे दोन टेम्पोंना थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यात एका टेम्पोत ५१ व दुसºया टेम्पोत ३५ प्रवासी मिळून आले.

अंबाडी रोड, ६० फुटी रोडवर एका टेम्पोची तपासणी केली असता त्यात १२ प्रवासी आढळून आले. तिन्ही टेम्पोतील ९८ प्रवाशांनी आपण उत्तर प्रदेशात जात असल्याचे पोलिसांना सांगितले. माणिकपूर पोलिसांनी हे तिन्ही टेप्पो ताब्यात घेऊन चालक, मालक व क्लीनर यांच्यावर कारवाई करीत या टेम्पोमधील पररप्रांतीय लोकांची विनापरवानगी वाहतूक, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान तसेच विनापरवाना प्रवासी वाहतूक करीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: coronavirus: Unlicensed foreign tempo caught, three tempos filled with 98 foreign migrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.