ठाणे -तीन महिन्यांपासून कोरोनाचा सामना करताना आरोग्य विभागातील पदांची गळती झाली आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळामुळे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीचा फटका ठाण्यातील कोरोना रुग्णांना बसला आहे. रूग्णांना वेळेत बेड न मिळणे, अॅम्ब्युलन्स वेळेत न येणे, यामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याचे शहरातील चित्र आहे. ही परिस्थिती सुधारून ठाणेकरांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांवर गेली आहे. ३४० रुग्णांनी जीव गमावला असून अनेकांना वेळेत उपचारच मिळाले नव्हते. पालिकाने प्रभाग समितीनिहाय टीम नेमली आहे, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. ही टीमही काहीच काम करत नसल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात ३० आरोग्य केंदे्र आहेत. यामध्ये ३० हून अधिक वैद्यकीय अधिकारी आहेत. पण, या अधिकाऱ्यांवर सर्व जबाबदारी सोपवल्यामुळे काम करणे कठीण जात आहे. कर्मचारी वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे एका वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले.ठाण्यात एकूण लोकसंख्या २६ लाख आहे. मात्र, पालिकेचे केवळ ३० आरोग्य केंद्रे कार्यरत असून अॅम्ब्युलन्स सेवाही नाही. या केंद्रातील अधिकाºयाला रुग्णतपासणीपासून कोरोना रुग्णाला रुग्णालय मिळवून देण्यापर्यंतची सर्वच कामे करावी लागत आहेत. यातच वैद्यकीय अधिकाºयांचे दररोज पाच-सहा तास जात असल्यामुळे ते उपचारांच्या सुविधा देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने कर्मचाºयांची संख्या वाढवून रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी केली.आपला दवाखाना कागदावरचआपला दवाखाना सुरू करण्याबाबत दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवली. पण, अवघ्या सहा महिन्यांत ती अपयशी ठरूनही आणखी ५० दवाखाने उभारण्याची घोषणा केली. ५० दवाखाने यापूर्वीच योग्य उपाययोजनांसह सुरू केले असते, तर कोरोनाच्या लढ्यात हे खूप उपयुक्त ठरले असते. त्यामुळे महापालिकेने याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.
coronavirus: ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे कोरोनामुळे तीनतेरा, आरोग्य केंद्रे व्हेंटिलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 01:04 IST