Coronavirus : ठाणे जिल्ह्यात २५८ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:47 IST2021-09-21T20:47:00+5:302021-09-21T20:47:27+5:30
Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या २५८ रुग्णांची वाढ झाली असून सात जणांचा मृत्यू मंगळवारी झाला आहे. ठाण्यात ६४ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे.

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात २५८ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू
ठाणे - ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या २५८ रुग्णांची वाढ झाली असून सात जणांचा मृत्यू मंगळवारी झाला आहे. ठाण्यात ६४ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. कल्याण डोंबिवलीला ६५ रुग्ण वाढ झाली असता दोन मृत्यू नोंद झाले. नवी मुंबईत ६० रुग्णांच्या वाढीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. भिवंडीत आज रुग्ण नाही आणि मीरा भाईंदरला २९ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. अंबरनाला एक रुग्ण वाढ झाली. बदलापूरमध्ये सात रुग्णांची आज वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात २४ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू नोंद झाला आहे.