शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 09:12 IST

मुकुंद केणी हे कळव्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. सलग दुसऱ्यांदा त्यांनी नगरसेवक पद भुषविले होते.

ठाणे  : कोरोनाशी लढा देता देता 14 दिवसाच्या लढाईत अखेर राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन आणि एक नातु असा परिवार आहे. मागील 14 दिवस ते मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. परंतु त्यांना मधुमेहाचा देखील त्रास होता, तसेच बीपीचाही त्रास त्यांना जाणवत होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासून 14 दिवस ते व्हेंटीलेटरवर होते. डॉक्टरांचे देखील शर्तीचे प्रयत्न सुरु होते. परंतु त्यांचे हे प्रयत्न देखील असफल ठरले आणि केणी यांचा मृत्यू झाला.

मुकुंद केणी हे कळव्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. सलग दुसऱ्यांदा त्यांनी नगरसेवक पद भुषविले होते. अतिशय शांत, मनमिळावू स्वभाव आणि त्यांच्या जवळ गेलेला एकही माणूस कधीच खाली हात येत नव्हता. सर्वाशी त्यांचे चांगले संबंध होते. देशभरात कोरोनाची लागण झाल्यानंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत होते. कळव्यात सुरवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेक गोर गरीब नागरीकांचे हाल सुरु होते. अशातच संपूर्ण केणी कुटुंब या नागरीकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले होते. पहिल्या दिवसापासून अगदी आतापर्य़ंत त्यांच्याकडून प्रत्येकाला मदतीचा ओघ सुरुच होता. त्यातच एखाद्याची टेस्ट केली जात नसेल, एखाद्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नसेल तर केणी हे स्वत: रुग्णालयात जात होते. अशातच कळवा रुग्णालयात एकाला दाखल करण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना ताप येऊ लागला, तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता.

लागलीच त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना घोडबंदर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मागील 14 दिवस ते व्हेंटीलेटरवर होते, त्यात त्यांना मधुमेहाचा आणि बीपीचाही त्रास  होता. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, मागील 14 दिवस त्यांचा कोरोनाशी लढा सुरु होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका