शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

coronavirus: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करा, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:40 AM

कोकण रेल्वे वरिल स्थानकांपासून सावंतवाडी रोड साथानकापर्यंतच सेवा द्यावी. आरक्षित गाड्यांचे आरक्षण तिकीट विक्री काही दिवस अगोदरच उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे.

डोंबिवली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात २२ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना नियोजन करावे लागणार असून त्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.  त्यात त्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या असून अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आल्या आहेत. कल्याण, दिवा, ठाणे या स्थानकातून विशेष गाड्या सोडल्यास लाखो कोकण वासीयांना दिलासा मिळेल, त्यांची गैरसोय कमी होईल.गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करताना कोकण मार्गावर कोकण रेल्वे प्रवाशांकरीताच असाव्यात. कोकण मार्गावर दैनंदिन  चार सत्रात सकाळपासून रात्रीपर्यंत  तीन, एक, एक, तीन अश्या एक्सप्रेस गाड्यांची सेवा उपलब्ध करून द्यावी. कोकण रेल्वे मार्गावर ही सेवा “मुंबई, दादर टर्मि., लो. टि. टर्मि., दिवा जं., वांन्द्रे टर्मि., कल्याण जं., वसई जं.” या रेल्वे स्थानकांवरून कोकण रेल्वे सेवा उपलब्ध असावी.कोकण रेल्वे वरिल स्थानकांपासून सावंतवाडी रोड साथानकापर्यंतच सेवा द्यावी. आरक्षित गाड्यांचे आरक्षण तिकीट विक्री काही दिवस अगोदरच उपलब्ध करावीत.    आरक्षण पद्धतीत दलालांवर कडक अंकुश ठेवूनच ऑनलाईन तिकिट विक्री सेवा देण्यात यावीत. आरक्षित गाड्यांबरोबर अनारक्षित गाड्यांची सेवा ही तितकीच उपयुक्त असल्याने ही सेवा उपलब्ध करावीत.     रेल्वे गाड्यांचे निर्जंतुकिकरण वेळोवेळी सुटण्याचे आणि अंतिम स्थानकांवर करण्याचे बंधनकारक करावेत. कोकण रेल्वे मार्गावर सर्व गाड्यांमध्ये तसेच कोकण रेल्वे स्थानकांवर अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांना कठोर निर्बंध, मज्जाव (परवानगी नसावीत) करण्यात यावा.  कोकण रेल्वे स्थानकांवरून गावात जाण्यासाठी राज्य परिवहनांची (शक्यतो रेल्वे गाड्यांच्या “त्या” स्थानकावर आगमन निर्गमन वेळेप्रमाणे) सेवा उपलब्ध करावीत. कोकण मार्गावर धावणाऱ्या इतर मेल, एक्सप्रेस, रोरो सेवा,  मालगाडी सेवा देताना कोकण रेल्वे वर गणपती विशेष रेल्वे सेवा वेळेतच द्यावीत. या निवेदनाची योग्य ती दखल घेवून कोकणवासियांच्या गणेशोत्सवात रेल्वे, राज्य परिवहन, गणेश आगमन- निर्गमन काळात नियमावलीनुसार वाहतुकीचे ही नियोजन करावे अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सव