शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

coronavirus: वैद्यकीय कर्मचारी भरतीला केवळ १५ टक्केच प्रतिसाद, केडीएमसीतील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 2:08 AM

केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारांच्या घरात गेली असून, त्या तुलनेत मनपाची आरोग्य यंत्रणा थिटी आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय अशा एकूण ८९० पदासांठी भरती प्रक्रिया राबविली. मात्र, आतापर्यंत केवळ १६१ जणच प्रत्यक्ष कामावर हजर झाले आहेत. ते पाहता मनपाच्या भरती प्रक्रियेला केवळ १५ टक्केच प्रतिसद मिळाला आहे. परिणामी, उर्वरित ७२९ पदे कशी भरायची, असा पेच प्रशासनापुढे आहे.केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते. तसेच मनपा विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, कोविड रुग्णालये सुरू करत असून, तेथे डॉक्टर, नर्सची गरज आहे. मनपाकडे एमडी पदवीधारक डॉक्टर नाही. त्यामुळे दोन एमडी डॉक्टरांसाठी जाहिरात देण्यात आली. त्यांना पगार कमी असल्याने सुरुवातील दोन लाख तर, नंतर अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. तरीही या पदांना प्रतिसाद मिळालेला नाही. एमबीबीएस १२० डॉक्टर हवे होते. पण, या पदासाठीही कोणीही मुलाखतीसाठी आले नाही.बीएएमएस पदासाठी १२० डॉक्टर हवे होते. पण अवघे १२ डॉक्टर मनपाच्या सेवेत रुजू झाले आहेत. ५८८ नर्सची आवश्यकता असताना केवळ ९७ नर्स कामावर हजर झाल्या आहेत. १४ एक्स रे तंत्रज्ञ हवे असताना १२ जण मिळाले आहेत. फार्मासिस्टच्या १५ च्या १५ जागा भरल्या गेल्या आहेत. नऊ इसीजी तंत्रज्ञांची गरज असताना तिघांनी काम स्वीकारले आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या २४ पैकी २२ जागा भरल्या गेल्या आहेत. मुलाखतीला प्रतिसाद मिळाला असला तरी कोरोनाच्या भीती पोटी अनेकांनी कामावर हजर होण्याची आॅर्डर स्वीकारलेली नाही.७२९ पदांसाठी पुन्हा होणार भरती?कोरोनाकाळात अन्य क्षेत्रांच्या तुलनेत केवळ आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. केडीएमसीतील विविध ८९० पदांपैकी केवळ १५ टक्के म्हणजे १६१ पदे भरली गेली आहेत. उर्वरित ७२९ पदांसाठी केडीएमसीला पुन्हा भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.मनपाने १० दिवसांत एक हजार खाटांची व्यवस्था उभारण्याचा दावा केला आहे. तसेच प्रत्येक प्रभागांत किमान ३०० खाटांचे क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून जवळपास २५ हजार खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे या व्यवस्थेसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे.वॉर्डबॉयच्या ८० पदांसाठी १,११३ पात्रभरती प्रक्रियेत केवळ वॉर्डबॉयची भरती अपवाद ठरली आहे. ८० पदांसाठी एक हजार १८९ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एक हजार ११३ जण पात्र ठरले आहेत. त्यामुळे पदसंख्या कमी आणि प्रतिसाद जास्त, असे चित्र पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका