लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील खासगी रु ग्णालयांमध्ये कोरोनारुग्णांकडून वसूल केलेली १९६ वादग्रस्त बिले म्हणजे हिमनगाचे एक टोेक आहे. ठाण्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून प्रत्येक रुग्णाचे बिल काटेकोरपणे तपासून जादा आकारलेले पैसे रुग्णांना परत मिळवून द्यावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.महापालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांच्या आधिपत्याखालील विशेष पथकाने शहरातील १५ कोरोना रु ग्णालयांमधील बिल तपासणीला सुरुवात केली आहे. यामध्ये तब्बल १९६ बिले ही वादग्रस्त आढळली आहेत. महापालिकेने याबाबत घेतलेल्या निर्णयाचे नगरसेवक पवार यांनी स्वागत केले आहे. मात्र, आतापर्यंत ठाण्यातील खासगी रु ग्णालयांमध्ये पद्धतशीरपणे शेकडो रु ग्णांची लूट केली गेली आहे. त्यामुळे यातील १९६ वादग्रस्त बिले म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्यायचे मतही पवार यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर वाढती रु ग्णसंख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने काही खासगी रु ग्णालयांना कोविड रु ग्णांना दाखल करण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी सामान्य कक्षासाठी दररोज चार हजार रु पये, तर व्हेंटिलेटर लावण्यात आलेल्या रु ग्णांसाठी दहा हजार रु पये दर निश्चित केला होता. मात्र, त्याला खासगी रुग्णालयांकडून हरताळ फासण्यात आला. काही रुग्णालयांनी दररोज किमान साडेबारा हजारांपासून वसूली केली होती. पीपीई किट, मास्कसाठी साडेतीन हजार रु पये, डॉक्टर व्हिजिट-निवासी डॉक्टर व्हिजिट आदींसाठीही ५०० रु पयांपासून दोन हजार रु पये घेतले आहेत. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये या बिलांमधून कोटयवधींची लूट झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगीरु ग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रु ग्णाचे बिल तपासावे. त्याचबरोबर जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांची नावे जाहीर करुन संबंधित रुग्णांना त्याबाबतच्या तक्रारी देण्याचेही आवाहन करण्यात यावे, अशी अशी मागणी नगरसेवक पवार यांनी महापालिका आयुक्त शर्मा यांच्याकडे केली आहे.
Coronavirus News: ठाणे महापालिकेने खासगी रु ग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रु ग्णाचे बिल तपासावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:55 IST
ठाण्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून प्रत्येक रु ग्णाचे बिल काटेकोरपणे तपासून जादा आकारलेले पैसे रु ग्णांना परत मिळवून द्यावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
Coronavirus News: ठाणे महापालिकेने खासगी रु ग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रु ग्णाचे बिल तपासावे
ठळक मुद्दे कोरोनाची १९६ वादग्रस्त बिले म्हणजे हिमनगाचे टोकभाजपचे नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप