CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात आढळले ३९८ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 02:12 IST2020-05-23T02:11:52+5:302020-05-23T02:12:19+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : ठामपामध्ये १९७ रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या एक हजार ७५७ इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५३ झाली.

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात आढळले ३९८ रुग्ण
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच असून शुक्रवारी विक्रमी ३९८ बाधितांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ५ हजार ६८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी एकट्या ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक १९७ रुग्ण मिळाले आहेत. भिवंडीत शुक्रवारी एकही नविन रुग्ण आढळला नाही. तर केडीएमसीतील एकूण रुग्ण संख्या ७०० वर गेली आहे. त्याचबरोबर ठामपात दोघांचा तर केडीएमसी आणि बदलापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
ठामपामध्ये १९७ रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या एक हजार ७५७ इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५३ झाली. त्याच्या पाठोपाठ नवी मुंबईत ६३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या एक हजार ४८५ वर गेली आहे.
तर कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या ७०० झाली असून एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. मीरा भार्इंदर येथे ५१ रुग्ण सापडले असून त्या ठिकाणच्या रुग्णांची संख्या ४५४ वर पोहोचली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ११ रुग्ण मिळून आल्याने एकूण रुग्ण संख्या २४३ झाली आहे. बदलापूर येथे १० रुग्ण सापडले असून तेथील संख्या २४७ झाली असून एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४ झाली आहे.
अंबरनाथ येथे ६ रुग्ण आढळले असून तेथील रुग्ण संख्या ५४ झाली आहे. उल्हासनगरमध्ये २ रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्ण संख्या १५६ वर गेली आहे. भिवंडीत एकही रुग्ण न सापडल्याने एकूण रुग्ण संख्या ८२ वर स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.