CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, शनिवारी सापडले ६४५ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:53 IST2020-11-01T00:53:32+5:302020-11-01T00:53:55+5:30
CoronaVirus News: ठाण्यात १६३ नवे रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४६ हजार ६६६ बाधित रुग्ण झाले असून एक हजार १५२ मृत्यूंची नोंद झाली आहे.

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, शनिवारी सापडले ६४५ रुग्ण
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत मोठी घट पाहायला मिळत असून शनिवारी ६४५ नवे रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता दोन लाख ११ हजार ५२२ झाली आहे. तर, १९ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता पाच हजार ३४२ वर पोहोचली आहे.
ठाण्यात १६३ नवे रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४६ हजार ६६६ बाधित रुग्ण झाले असून एक हजार १५२ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत नव्याने १३६ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ५० हजार ६४ झाली आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरला १९ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरात १४ बाधित आढळले. मीरा-भाईंदरमध्ये ८२ रुग्णांची तर पाच मृत्यूंची नोंद झाली. अंबरनाथमध्ये ३१ रुग्ण सापडले असून तिघांच्या मृतांची नोंद आहे. बदलापूरमध्ये १३ रुग्ण सापडल्याने आता बाधित सात हजार ३५७ झाले आहेत. जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये ३८ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू झाले आहेत. ग्रामीण भागात १६ हजार ८४४ बाधित झाले असून मृतांची संख्या ५३० आहे.
नवी मुंबईत १४९ रुग्ण वाढले
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवारी १४९ रुग्ण वाढले असून २०२ जण बरे झाले आहेत. शहरात फक्त १८१७ रुग्ण शिल्लक आहेत. तिघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९०१ झाला आहे. मनपाने आतापर्यंत तब्बल
२ लाख ८१ हजार नागरिकांची चाचणी पूर्ण केली आहे.
वसई-विरारमध्ये ९२ रुग्ण कोरोनामुक्त
वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचवेळी ६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आता शहरांत ९२१ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
रायगड जिल्ह्यात १३५ कोरोना रुग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी १३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या ५३ हजार ९९९ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला तर १६४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.