शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गणेशोत्सवात दानपेटी नव्हे, मास्क, सॅनिटायझरपेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:41 IST

‘विघ्नहर्ता’चा उपक्रम; गरिबांना वाटणार

ठाणे : जगभर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे ठाण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी अभिनव निर्णय घेतले आहेत. यात यंदा दानपेटी नव्हे, तर मास्क आणि सॅनिटायझरपेटी ठेवण्याचा निर्णय वागळेच्या विघ्नहर्ता या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.कोरोना अद्याप आटोक्यात आला नसल्याने गणेशोत्सवावरदेखील यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. त्या धर्तीवर महापालिकेने आपली नियमावली जाहीर करून गणेशोत्सव साजरा करण्याचे सूचित केले आहे.कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी गणेशभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंडळांनीदेखील त्यांच्या पातळीवर उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. हॉटस्पॉट अथवा कंटेनमेंट झोनमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १० दिवसांचा गणेशोत्सव हा दीड दिवसावर आणला आहे.ठाणे शहरात मागील ३० वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या वागळेच्या विघ्नहर्ता या मंडळाने दानपेटीपेक्षा मास्क आणि सॅनिटायझरपेटी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पेटीत भक्तांना मास्क आणि सॅनिटायझरदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पेटीत जमा होणारे हे मास्क आणि सॅनिटायझर हे रस्त्यावर राहणाºया गोरगरिबांना वाटप करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले.रस्त्यावर अनेक गोरगरीब लोक राहतात. ज्यांना या कोरोनामुळे एकवेळचे अन्न मिळेनासे झाले आहे, त्यांना मास्क आणि सॅनिटायझर खरेदी करणे अशक्य असते. त्यामुळे ते विनामास्कचे फिरत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांना हे वाटप केले जाणार आहे.यंदा आरोग्य उत्सवमंडळ यंदाचे वर्ष हे आरोग्य उत्सव म्हणून साजरे करणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यात रक्तदान शिबिर, आरोग्यतपासणी आणि अवयवदान हे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहे. तसेच यंदा वर्गणी न घेता पदाधिकाऱ्यांकडून निधी गोळा करून यंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या