CoronaVirus News: केडीएमटीही धावणार उद्यापासून; चार मार्गांवर सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:07 AM2020-06-17T00:07:50+5:302020-06-17T00:08:10+5:30

नोकरदार, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, एसटीचा भार होणार कमी

CoronaVirus News KDMT buses to run from tomorrow | CoronaVirus News: केडीएमटीही धावणार उद्यापासून; चार मार्गांवर सेवा

CoronaVirus News: केडीएमटीही धावणार उद्यापासून; चार मार्गांवर सेवा

Next

कल्याण : लॉकडाऊनमुळे गेली अडीच महिने कल्याण-डोंबिवलीतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेली केडीएमटीची बससेवा गुरुवारपासून चार मार्गांवर सुरू होत आहे. त्याचा लाभ नोकरदार आणि सामान्य प्रवाशांनाही होणार आहे. तसेच या सेवेमुळे सध्याचा एसटी महामंडळावर येणारा भारही कमी होणार आहे.

केडीएमटी उपक्रम लॉकडाऊनमुळे पूर्णपणे ठप्प होता. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी एकही बस आजपर्यंत धावलेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ४० बस चालू ठेवण्यात आल्या आहेत. अनलॉक १ मध्ये एसटी बसची सुरू झालेली वाहतूक आणि त्यावर आलेला ताण पाहता परिवहन उपक्रमाच्या बस रस्त्यावर कधी धावतील, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते. त्यात आता रेल्वेनेदेखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीही वाहतूकसेवा सुरू केली आहे.

दरम्यान, गुरुवारपासून सुरू होणाºया केडीएमटीच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे लागणार आहेत.
केडीएमटीच्या ताफ्यात २१८ बस असल्या तरी वाहक आणि चालकांच्या कमतरतेमुळे ७० ते ७५ बस रस्त्यावर धावतात. उपक्रमाची सेवा महापालिका क्षेत्रासह टिटवाळा, बदलापूर, भिवंडी, अलिमघर, वाशी, कोकण भवन, पनवेल अशा एकूण ३३ मार्गांवर दिली जाते.
परंतु, पहिल्या टप्प्यात उपक्रम चालू करताना कल्याणमध्ये रिंगरूट आणि मोहना परिसर तर डोंबिवलीतील लोढा हेवन आणि निवासी भागासाठीच केडीएमटीच्या बस धावणार आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे.

अत्यावश्यक कर्मचाºयांसाठी असलेली सेवा सुरूच राहणार
केडीएमटी सध्या कल्याण-डोंबिवलीसह लगतच्या बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची
ने-आण करीत आहे. केडीएमसी परिक्षेत्रांतर्गत वैद्यकीय सेवा बजावणाºया डॉक्टर आणि परिचारिकांनाही आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात येणे-जाणे सोयीचे व्हावे, यासाठी विशेष बस सोडण्यात आल्या आहेत.

कल्याणमधील महात्मा फुले चौक, चिकणघर, अन्सारी चौक, आंबेडकर रोड, मोहने, मांडा, तिसगाव, कोळसेवाडी तर, डोंबिवलीतील दत्तनगर, मढवी, शास्त्रीनगर, ठाकूरवाडी, पाटकर, मंजुनाथ, नेतिवली नाका, पंचायत बावडी येथील आरोग्य केंद्रांवर जाण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिकांना बस उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, ही सेवा सुरूच राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.

Web Title: CoronaVirus News KDMT buses to run from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.