शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाण्यात लवकरच २५०० अतिरिक्त बेड्स; एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:42 IST

तीन कोविड रुग्णालये लवकरच सेवेत

ठाणे :  शहरात दिवसाला सरासरी एक हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याची बाब लक्षात घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल होताना अडचण होऊ नये, यासाठी ठाणे महापालिका सज्ज असून तीन नव्या कोविड रुग्णालयांच्या माध्यमातून अडीच हजार बेड्स लवकरच सेवेत दाखल होत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्होल्टास आणि ज्युपिटर रुग्णालयांशेजारील पार्किंग प्लाझा येथे महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.कोरोनाच्या पहिल्या लाटेत बुश कंपनीच्या जागेत रुग्णालय सुरू केले होते. तिथे ४५० बेड क्षमता आहे.  मधल्या काळात रुग्णसंख्या घटल्यामुळे या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. मात्र, पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हे पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पोखरण रोड क्र. २ येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवर एक हजार बेड क्षमतेचे रुग्णालय उभारले असून तेही रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे.  पार्किंग प्लाझा येथे ११६९ बेड क्षमतेचे रुग्णालय उभारले असून त्याचा अंशतः वापरही सुरू झाला आहे. सध्या येथे ३५० बेडचा वापर हाेत आहे. मनुष्यबळ वाढवून ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  येथे आणखी किमान ५०० बेड वाढवण्याची क्षमता असून त्यादृष्टीनेही नियोजन करण्याची सूचना केली. तीन दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाच्या लढ्यासाठी पुन्हा पूर्ण क्षमतेने सज्ज होण्याचे आदेश त्यांनी दिले होते. बेड उपलब्ध नाही, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, अशा तक्रारी येता कामा नयेत. या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी करावी, असे निर्देश देतानाच कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर, महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून तीन कोरोना रुग्णालये तातडीने रुग्णसेवेत दाखल करण्यात येणार आहेत. त्यांची पाहणी शनिवारी शिंदे यांनी केली. महापौर नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, विश्वनाथ केळकर, संदीप माळवी, आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर, डॉ. खुशबू टावरी व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.‘पुरेसा औषधसाठा करा’ऑक्सिजन बेड्सना ऑक्सिजनचा पुरवठा अव्याहृत होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. रुग्णालयांमध्ये तसेच क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणाच्या अथवा गैरसोयीच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत, असेही त्यांनी बजावले. औषधांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEknath Shindeएकनाथ शिंदे